‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नेहमी चर्चेत असते. या मालिकेत तिने उत्कृष्ट खलनायिका साकारली आहे. ही खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. नुकतीच अपूर्वाने वडिलांच्या आणि भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेआधी अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकली होती. या पर्वाची ती उपविजेती ठरली. हे पर्व संपल्यानंतर अपूर्वाच्या घरी दुःखद घटना घडली. तिच्या सख्ख्या भावाचं निधन झालं. त्यामुळे अपूर्वा सतत भावाच्या आठवणी शेअर करत असते. नुकतीच ती हरिहरेश्वरला गेली होती, ज्या ठिकाणी तिच्या वडिलांची आणि भावाची अस्थी विर्सजन केलं आहे. त्यामुळे अपूर्वा हरिहरेश्वरला गेल्यानंतर भावुक झाली. ती मनसोक्त रडली.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

हेही वाचा – ‘सलमान खाननं आता दुसरा गुन्हा केला’, सलीम खान यांच्या टिप्पणीनंतर बिश्नोई समाजाचा संताप

हरिहरेश्वर येथील काही फोटो शेअर करत अपूर्वा नेमळेकरने लिहिलं, “सर्वांनाच माहिती आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे…प्रत्येकाला एक ना एक दिवस या सुंदर जीवनाचा निरोप घ्यायचाच आहे…आणि या एकमेव मिळालेल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला लाभलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यायला (detachment) हे कोणाला जमलंय? माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरुच आहे…त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा त्याच वळणावर फिरून आले.”

“श्री. क्षेत्र हरिहरेश्वर (कोंकण दक्षिण काशी) ही तिचं जागा जिथं मी माझ्या बाबांचं आणि भावाचं अस्थी विसर्जन केलं होतं आणि त्याचं ठिकाणी त्या अथांग सागरावर पुन्हा एकदा उभं राहिल्यावर थंड पाण्याचा स्पर्श जेव्हा झाला तेव्हा जणू असं वाटलं की पप्पा आणि ओंकारला घट्ट मिठी मारली आहे. आणि आज या अथांग सागरकिनारी दाटून आलेला ढग सुद्धा बरसला, त्याचं सोबतच दाटून आलेल्या मनाचा सुद्धा डोळ्यातून बांध फुटला…आणि मी मनसोक्त रडले…आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळया भावना आपण अनुभवतो, शिकतो, अंमलात आणतो…परंतू detachment ही एकमेव अशी भावना आहे की ते कोणी शिकवतं नाही. त्याचा शोध आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो…असो detachment जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असाच सुरू राहील. परंतू जेव्हा जमेल तेव्हा यां दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं…म्हणजे मन हलक होतं…मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने…लवकरच…” अशी भावुक पोस्ट अपूर्वाने लिहिली आहे.

हेही वाचा – सतत मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान मनातलं बोलला सलमान खान? म्हणाला, “मला बिग बॉसच्या सेटवर…”

दरम्यान, अपूर्वा नेमळेकरच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “पहिल्यांदा तुम्ही लिहिलेलं काही आवडलं…डोळे भरून आले”, “ते दोघं तुमच्याबरोबर कायम आहेत…तुम्ही अशा उदास राहू नका. कुठल्याही वडिलांना, भावाला हे आवडत नाही की त्यांच्या घरची लेक अशी दुःखी आहे. कायम आनंदी राहा…सुखी राहा”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहे.

Story img Loader