तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ४ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झालेली ही मालिका अल्पावधीत घराघरात पोहोचली. मालिकेतील पात्र मुक्ता, सागर, सई, सावनी, इंद्रा, माधवी, पुरू, जयंत कोळी, मिहिर, मिहिका या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आता मुक्ता-सागरच्या लग्नामुळे मालिकेला आता नवं वळणं मिळालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुक्ता-सागरच्या लग्नानंतर एक आनंदाची गोष्ट देखील घडली. ती म्हणजे सईची कस्टडी मुक्ताला देण्यात आली. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणांची प्रेक्षक वाट बघत होते, तो क्षण अखेर आला. सई मुक्ताची झाली. पण आता मुक्ता-सागरमधलं प्रेम कसं खुलणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. अशातच सावनी म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने इन्स्टाग्रामवर एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “माझ्यासारखा पोलीस खात्यात आला असता…”, मिलिंद गवळींकडे धावत आलेल्या चाहत्यांना पाहून वडिलांची होती ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने काही तासांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अपूर्वा सुरुवातीला रडताना दिसत आहे. पण नंतर ती संजीवनी जाधव यांच्याबरोबर डान्स करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर अभिनेत्रीने लिहिल आहे, “कोर्ट केस हरल्यावर मी…पण इंद्रा मूड चेंजर आहे.”

हेही वाचा – टीआरपी शर्यतीत ‘ठरलं तर मग’चं अधिराज्य कायम, ‘या’ मालिकांच्या TRP मध्ये झाली घसरण

अपूर्वाने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा पाऊल पडला आहे. “जबरदस्त”, “चांदणे”, “खतरनाक”, “खूप छान”, “एक नंबर”, “किती मस्त”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. अपूर्वा व संजीवनी जाधव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.