‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. विशेष म्हणजे या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताच्या लव्हस्टोरीनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं. आता यामधील शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. असं असलं तरी अपूर्वाला अजूनही शेवंता या भूमिकेची आठवण येत आहे. यासंबंधित तिनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची शेवंता ही भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सतत शेवंताच्या भूमिकेतील अपूर्वाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. असाच एक शेवंताचा व्हायरल व्हिडीओ अपूर्वानं शेअर केला आहे. ज्यामध्ये शेवंताचा घायला करणारा लूक पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “सतत प्रवासात…” आदर्श शिंदेने उत्कर्षचा सांगितला खास गुण; फोटो पोस्ट करत म्हणाला…
अपूर्वानं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “हा व्हिडिओ अचानक दिसला आणि या भूमिकेशी जोडलेल्या अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अजूनही शेवंता लोकांच्या मनावर राज्य करत आहे.”
अपूर्वाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “अपूर्वा तू निभावलेली शेवंताची भूमिका खूप भारी होती.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “कोट्यवधी हृदयाची राणी शेवंता आहे.”
दरम्यान, ४ सप्टेंबरपासून अपूर्वा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत तिनं खलनायिका सावनी ही भूमिका साकारली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अपूर्वा शेवंताप्रमाणे सावनीची भूमिका गाजवणार का? हे येत्या काळात समजेल. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वा व्यतिरिक्त तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले पाहायला मिळणार आहे.