‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची ती रनरअप ठरली. सध्या ती तिच्या कामामध्ये व्यग्र आहे. पण, काही महिन्यांपूर्वी अपूर्वाच्या आयुष्यात दु:खद घटना घडली होती. अपूर्वाचा धाकटा भाऊ ओमकार नेमळेकरचं एप्रिल महिन्यात निधन झाल्याने तिचं संपूर्ण कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेलं होतं. आता अपूर्वाने भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “‘बॉईज ४’च्या ट्रेलरमध्ये तुझे सीन्स कट का केलेत?” चाहत्याच्या प्रश्नावर अभिनय बेर्डे म्हणाला, “त्यांनी असं…”

अपूर्वाने इन्स्टाग्रामवर तिच्या संपूर्ण कुटुंबाबरोबरचा फोटो शेअर केल आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्री लिहिते, “प्रिय ओम, ७ ऑक्टोबरच्या दिवशी याआधी मी प्रचंड आनंदी असायचे. आपल्या बालपणी आपण घरी बनवलेला केक, घरगुती सजावट आणि छान असे कपडे घालून आपण तुझा वाढदिवस साजरा करायचो. जसजसे आपण मोठे झालो तसे, आपण आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करू लागलो. या सगळ्यात खूप आनंद मिळाला. पण, हा आनंद असा आठवणीत जमा होईल असं कधीच वाटलं नव्हतं.”

हेही वाचा : “एआर रेहमान इतकं वाईट गाणं कसं बनवू शकतात?” स्वतः गायलेल्या गाण्याबद्दल सोनू निगमचा सवाल; म्हणाला…

“तुझ्याशिवाय हे आयुष्य अपूर्ण आहे. मला आशा आहे की, तू स्वर्गातून आमच्याकडे हसतमुखाने पाहत असशील. तुझ्या सगळ्या आठवणी आम्ही कायम जपून ठेऊ. प्रिय ओम… तुझी आठवण जपणं सोपं आहे पण, तुला गमावण्याचं दुःख कधीच दूर होऊ शकणार नाही. माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…भविष्यात एक दिवस आपण नक्की एकत्र येऊ…तुझी प्रचंड आठवण येत आहे. तुला खूप खूप प्रेम” अशी भावुक पोस्ट अपूर्वाने लहान भावाच्या आठवणीत शेअर केली आहे.

हेही वाचा : Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

एप्रिल महिन्यात अभिनेत्रीच्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. भावाच्या निधनानंतर अपूर्वाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे भावुक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta fame apurva nemlekar shared emotional post for late brother sva 00