देशभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतात हा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. मराठी वर्षातील होळी हा शेवटचा सण असून सध्या सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळी चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. शिवाय कलाकार स्वतः देखील होळीच्या रंगात रंगून गेलेले पाहायला मिळत आहेत. अशातच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आदित्य-सईच्या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आदित्यची भूमिका बालकलाकार सोहम साळुंखे आणि सईची भूमिका इरा परवडेने उत्तमरित्या साकारली आहे. दोघांच्या भूमिकेवर प्रेक्षक खूप प्रेम करताना दिसत आहेत. सई म्हणजेच इराच्या इन्स्टाग्राम पेजवर होळीनिमित्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये इरा व सोहम रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या ‘आला होळीचा सण लय भारी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहेत.
सोहम व इराच्या या डान्स व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “छान”, “बहीण-भाऊ खूप क्यूट आहात”, “मस्त”, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – अमेरिकेहून भारतात परतणारी मृणाल दुसानिस पुन्हा मनोरंजनसृष्टीत करणार कमबॅक? म्हणाली, “मला आता…”
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे सध्या मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तसेच टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आहे.