‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तसंच मालिकेतील पात्रांना देखील प्रेक्षकांनी आपलंस केलं आहे. त्यामुळे मुक्ता, सागर, सई, इंद्रा, सावनी, माधवी, मिहीर, कोमल, स्वाती ही पात्र घराघरात पोहोचली आहेत. नुकताच मालिकेत मोठा बदल झाला. मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधान ऐवजी सध्या स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. अशातच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील इंद्राचा लेकीबरोबरच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल सोमारे गजमलने हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. कोमल नेहमी इंद्राबरोबरचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. कधी कोळी गाण्यांवर, तर कधी बॉलीवूडच्या लोकप्रिय गाण्यावर दोघी थिरकताना पाहायला मिळतात. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये इंद्रा म्हणजे अभिनेत्री संजीवनी जाधव आणि कोमलने आशा भोसलेंच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे.
हेही वाचा – “कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून…”, विशाखा सुभेदारची पतीसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू दाही दिशांना…”
“सर्वात एव्हरग्रीन कलाकारबरोबर…”, असं कॅप्शन देत कोमलने संजीवनी यांच्याबरोबरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघी मेकअप रुममध्ये डान्स करताना दिसत आहेत. दोघी आशा भोसले यांच्या ‘बाई मी पतंग उडवीत होते’ गाण्यावर थिरकल्या आहेत. संजीवनी आणि कोमल दोघी काळ्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने ‘अशी’ साजरी केली पहिली मकरसंक्रांत, फोटो झाले व्हायरल
संजीवनी आणि कोमलचा हा डान्स व्हिडीओ तेजश्री प्रधानला आवडल्याचं लाइकच्या माध्यमातून दिसत आहे. तेजश्री अवघ्या काही मिनिटांच हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओवर काही चाहत्यांनी दोघींचं कौतुक केलं आहे. दोघी खऱ्या आयुष्यातल्या मायलेकी वाटतं असल्याचं एक नेटकरी म्हणाली.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेनंतर सर्वाधिक टीआरपी असलेली मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ आहे. गेल्या आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी रेटिंग ५.७ होता. पण तेजश्रीच्या एक्झिटनंतर या टीआरपीवर काही परिणाम होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.