‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये सध्या मुक्ता-सागरमधलं प्रेम बहरताना दिसत आहे. दोघांमधली जवळीक अधिक वाढत असून दोघांचा रोमान्स पाहायला मिळत आहेत. तसंच दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन अखेर सावनीबरोबर लग्न करायला तयार झाला आहे. सावनीच्या हाताला हर्षवर्धनची मेहंदी लागली असून लवकरच दोघांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. त्यामुळे सावनी-हर्षवर्धनच्या लग्नानंतर मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच स्वाती व सई म्हणजेच अभिनेत्री कोमल सोमारे गजमल व बालकलाकार इरा परवडे यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील स्वाती व इंद्राचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. ‘सूसेकी’ व ‘लाजरान साजरा मुखडा’ या फ्युजन गाण्यावर स्वाती व इंद्रा जबरदस्त थिरकल्या होत्या. दोघींचा डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांच्या पाऊस पडला होता. “मांझी लारकी ताई आणि लारकी भाची क्या बात है”, “अरे व्वा”, “खूप छान”, “मस्त”, “सुपर डुपर”, “दोघी भारी”, “माई मस्तच”, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या होत्या. त्यानंतर आता स्वाती व सईच्या जबरदस्त डान्स व्हिडीओची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – जुलैमध्ये वाढदिवस, लवकरच झळकणार चित्रपटात; ‘पुष्पा २’च्या गाण्यावर थिरकणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

२०२१मध्ये प्रदर्शित झालेला ‘इश्कजादे’ चित्रपटातील ‘झाल्ला वाला’ गाण्यावर स्वाती व सईने डान्स केला आहे. श्रेया घोषालने गायलेल्या या गाण्यावर स्वाती व सईचा डान्स त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – Video: आमिर खानचा जावई अन् विहीणबाईंची परदेशवारी, नुपूर शिखरेची आईसह थायलंडमध्ये धमाल, स्कुटीवर फिरले माय-लेक

“तुम्ही दोघी गोड आहात”, “आत्या आणि भाची दोघी पण क्यूट आहात”, “तुमची मालिका खूप छान आहे. सगळे उत्कृष्ट अभिनय करतात”, “मस्त”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी स्वाती व सईच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – “जब्या मोठा गेम झाला रे…”, ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरातच जमलं? शालूबरोबर दुसऱ्याच मुलाचा फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टनुसार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी घसरला आहे. त्यामुळे टीआरपी यादीत टॉप-३मध्ये असणारी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आता चौथ्या स्थानावर आली आहे. मागील आठवड्यात तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला ६.६ रेटिंग मिळालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta fame komal gajmal and ira parwade dance on jhalla wallah song of ishaqzaade movie pps