गेल्या कित्येक महिन्यांपासून अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाचा यांच्या बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. पण सध्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. कारण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण वीएफएक्स व चित्रपटातील काही सीन्सचं चित्रीकरण बाकी असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वी बदलण्यात आली. आता १५ ऑगस्ट ऐवजी ६ डिसेंबर २०२४ला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. असं असलं तरी दुसऱ्याबाजूला चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे.
‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील आतापर्यंत दोनच गाणी प्रदर्शित झाली आहेत. पण दोन्ही गाण्यांनी सगळ्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘सूसेकी’ गाण्यांची भुरळ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पडली आहे. त्यामुळे प्रत्येकजण या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील स्वाती आणि इंद्राही ‘सूसेकी’ गाण्यावर जबरदस्त थिरकताना पाहायला मिळाल्या.
हेही वाचा – “तुमचा ब्रेकअप झाला होता का?” ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ व्हिडीओवर चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाल्या…
स्वाती म्हणजे अभिनेत्री कोमल सोमारे गजमलने ‘सूसेकी’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘सूसेकी’ व ‘लाजरान साजरा मुखडा’ या फ्युजन गाण्यावर स्वाती व इंद्रा डान्स करताना दिसत आहेत. दोघींचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
स्वाती व इंद्राच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मांझी लारकी ताई आणि लारकी भाची क्या बात है”, “अरे व्वा”, “खूप छान”, “मस्त”, “सुपर डुपर”, “दोघी भारी”, “माई मस्तच”, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. तसंच अभिनेत्री तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, सुकन्या मोने, समिरा गुजर, गौरी कुलकर्णी, सुलेखा तळवळकर अशा अनेक कलाकारांनी स्वाती व इंद्राचा हा व्हिडीओ लाइक केला आहे.