‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचा दिवसेंदिवस प्रेक्षकवर्ग वाढत चालला आहे. मुक्ता-सागरची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेत मुक्ता-सागरच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागामध्ये मुक्ताने सागरविषयी आपल्या मनातील भावना मिहीका आणि मंजिरीसमोर व्यक्त केली. तसंच सईवर तिचं किती प्रेम आहे, याविषयी ती बोलली. दुसऱ्याबाजूला सागर मिहीरसमोर व्यक्त होताना पाहायला मिळाला. पण त्यानंतर सागरने पूर्वाश्रमीची बायको सावनीच्या घरी जाऊन तमाशा केला. त्यामुळे सागर लग्न करणार असल्याचं सावनीला समजलं. आता सावनी सागर कोणत्या मुलीशी लग्न करणार याचा शोध घेणार आहे.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Aai Kuthe Kay Karto Fame Actor Went To North Finland
बॉर्डर क्रॉस केली अन्…; मराठी अभिनेता पत्नीसह ‘असा’ पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया! फोटो एकदा पाहाच…
Swanandi Tikekar new home
स्वानंदी टिकेकरने घेतलं नवीन घर! पतीसह फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, दाखवली नव्या घराची झलक
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”

हेही वाचा – शुभांगी गोखलेंनी दोन्ही हातावर स्वतः काढली मेहंदी, हे पाहून तेजश्री प्रधान कौतुक करत म्हणाली, “ती स्वयंभू…”

हेही वाचा – मुग्धा वैशंपायनच्या बहिणीचा लग्नसोहळा थाटामाटात पडला पार, गायिका म्हणाली, “जीजूचा कान पिळताना आम्ही…”

दरम्यान, गोखले-कोळी कुटुंबाने मुक्ता-सागरच्या लग्नाची सर्व तयारी केली आहे. साखरपुडा, मेहंदी, हळद, सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्नसोहळा पार पडणार आहे. प्रत्येक समारंभासाठी थीम ठरली आहे. हळदीसाठी सागरने म्हणजेच अभिनेता राज हंचनाळेने खास कोळी पेहराव केला आहे. हाच पेहराव पाहून राजची बायको मनीषा ऊर्फ मॉली डेस्वालने चांगलंच बजावलं आहे.

‘राजश्री मराठी शो बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना राजने बायकोची प्रतिक्रिया सांगितली. तो म्हणाला, “मी केलेला कोळी पेहराव पाहून बायको म्हणाली, ‘हे घरी घालून येऊ नकोस.’ कारण मी जेव्हा तिला फोटो पाठवला होता, तेव्हा संपूर्ण अंग हळदीने माखलं होतं. ते खूप भयानक होतं.”

Story img Loader