अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका आता घराघरात पोहोचली असून मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांनी आपलंस केलं आहे. मुक्ता, सागर, सई, माधवी गोखले, इंद्रा कोळी, लकी, मिहिर, मिहिका या सर्वांनी प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. कारण म्हणजे मुक्ता-सागरचा लग्नसोहळा. सईच्या प्रेमाखातर लग्नासाठी तयार झालेले मुक्ता-सागर लवकरच आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. दोघांचा पारंपारिक पद्धतीत लग्नसोहळा सुरू आहे. मेहंदी पार पडली असून लवकरच संगीत, हळद, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. मुक्ता-सागरच्या लग्नसोहळ्या निमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळी विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधत आहेत. सेटवरची मज्जा आणि बऱ्याच गोष्टी सांगत आहेत. नुकताच संगीत सोहळ्याच्यानिमित्ताने सागर म्हणजे अभिनेता राज हंचनाळेने ‘राजश्री मराठी शो बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी राजने खऱ्या आयुष्यातील संगीत सोहळ्यातील मज्जा सांगत, बायको मालिकेतील संगीतचा लूक पाहून काय म्हणाली? याविषयी बोलला.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
Premachi Goshta
Video : सईला मिळवण्यासाठी मुक्ताचं सावनीला खुलं आव्हान; म्हणाली, “पुढच्या ४ दिवसांत माझी मुलगी…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
Rapper Raftaar is all set to tie the knot with fashion stylist Manraj Jawanda
रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार! घटस्फोटाच्या ५ वर्षांनी रॅपर चढणार बोहल्यावर, होणारी बायको कोण आहे? वाचा…

हेही वाचा – Video: लवकरच ‘झी मराठी’वर दोन नव्या मालिका होणार सुरू, प्रोमो आला समोर

याआधी राजच्या बायकोने म्हणजेच मनीषा ऊर्फ मॉली डेस्वालने त्याला कोळी पेहरावात पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती की, हे घरी घालून येऊ नकोस. आता संगीतमधला अभिनेत्याचा लूक पाहून मॉली काय म्हणाली जाणून घ्या…

‘राजश्री मराठी शो बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना राजला विचारलं गेलं की, तुझा हळदीतला कोळी पेहराव पाहून बायको घरी घालून येऊ नकोस असं म्हणाली होती. तर आता संगीतमधला लूक पाहून काय म्हणाली? राज हंचनाळे मजेशीर उत्तर देत म्हणाला, “संगीत सोहळ्यातील पेहराव बघून मॉली म्हणाली की, असाच घरी लवकर ये…”

हेही वाचा – नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ बच्चन भारावले, सोशल मीडियावर पोस्ट करत आराध्याविषयी म्हणाले, “अभिमानास्पद क्षण…”

पुढे अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यातील संगीत सोहळ्याविषयी बोलला. म्हणाला की, “आमच्या संगीतात एकीकडे कोल्हापुरी गाणी आणि दुसरीकडे हरियाणवी गाणी सुरू होती. त्यांचं आम्हाला कळतं नव्हतं आणि आमचं त्यांना कळतं नव्हतं. पण सगळे नाचत होते. त्यावेळी एक वेगळाच माहौल झालेला असतो. आपल्याला काही अंदाज नसतो की, समोरच्याला काय वाटतंय, कोण बघतंय, याकडे कोणी लक्ष देत नाही. माझ्या बायकोने मला आता सांगितलं की, सेटवर पण तसंच नाच. १० वेळा इथे कोण बघतंय, तिथे कोण बघतंय, असं करत बसू नकोस.” असा सल्ला मॉलीने राजला दिला.

Story img Loader