सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका खूप चर्चेत आहे. कारण आहे तेजश्री प्रधान. अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका अचानक सोडल्यामुळे चाहत्यांसह प्रेक्षकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर नाराजीचे सूरज पाहायला मिळत आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळे घेतली आहे. लवकरच स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या एकाबाजूला तेजश्रीच्या एक्झिटमुळे मालिकेविषयी खूप चर्चा रंगली आहे. त्यातच दुसऱ्या बाजूला ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेता बायकोबरोबर परदेशात फिरायला गेला आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहिर म्हणजे अभिनेता राजस सुळे डिसेंबर २०२४मध्ये लग्नबंधनात अडकला. चैत्रीला पितळे हिच्याशी राजसने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये होते. अखेर डिसेंबर २०२४मध्ये राजस आणि चैत्रीलाचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पाहायला मिळाला.
लग्नासाठी राजस सुळे आणि चैत्राली पितळेने राजेशाही लूक केला होता. लग्नाच्या १९ दिवसांनंतर दोघं आता परदेशात फिरायला गेले आहेत. याचे फोटो, व्हिडीओ दोघांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. “चला जाऊया…” असं लिहित चैत्रालीने विमानतळाबाहेरील फोटो शेअर केला आहे. त्यानंतर राजसचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
मग राजसच्या पत्नीने फिरायला जाण्याचा ठिकाणाचा खुलासा केला आहे. तिसऱ्या स्टोरीमध्ये तिने नेटकऱ्यांना काही पर्याय देऊन फिरायला जाण्याचं ठिकाण निवडायला सांगितलं होतं. यावेळी नेटकऱ्यांनी अचूक उत्तर दिलं. राजस आणि चैत्राली न्यूझीलंडला फिरायला गेले आहेत.
दरम्यान, अभिनेता राजस सुळेने २०२३मध्ये प्रेमाची कबुली दिली होती. ‘हंच मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना राजस म्हणाला होता की, गेल्या आठ वर्षांपासून मी रिलेशनशिपमध्ये आहे. यावेळी त्याने चैत्रालीबरोबरचा फोटो देखील दाखवला होता. राजसच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे. त्याने साकारलेली मिहीरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आधी अभिनेता ‘हर हर महादेव’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने सदाची भूमिका साकारली होती. तसंच त्याने ‘एबीपी माझा’ वाहिनीवरील ‘मन सुद्ध तुझं’ या कार्यक्रमात काम केलं होतं.