रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेब सीरिज आहे. बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिने ‘ताली’मध्ये गौरी सावंत यांनी भूमिका निभावली आहे. या सीरिजमधील एका मराठमोळ्या अभिनेत्याचं सध्या जास्त कौतुक होतं आहे. तो म्हणजे सुव्रत जोशी. यादरम्यान सुव्रतच्या सासूबाई अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी या वेब सीरिजसाठीच्या त्याच्या लूक टेस्टचा गमतीशीर किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नाकतोडे, रेशीमकिडे, रातकिडे खातानाचा अभिनेता सुव्रत जोशीचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “हा जेवणाचा….”

अभिनेत्री शुभांगी गोखले लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचनिमित्तानं त्यांनी ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी शुभांगी यांना ‘ताली’ वेब सीरिजमधील सुव्रतच्या कामाविषयी विचारण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या की, “मला त्याचा अभिमान याच्यासाठी वाटला की, त्यानं आता ते जोखड उतरवून टाकलंय की, मी फक्त हिरोची भूमिका करणार. तो आताचा आघाडीचा नट आहे. तो सगळीकडे शॉट लिस्टेट असतो आणि त्याच्याकडे चांगले प्रोजेक्ट असतात. सुव्रतने एक अभिनेता म्हणून त्यानं ‘ताली’ वेब सीरिजमधल्या भूमिकेला होकार दिला. कारण तशी मोजायला गेली तर छोटीच भूमिका आहे. पण त्यानं एक अभिनेता म्हणून त्या भूमिकेचं महत्त्व ओळखलं, याचा मला अभिमान आहे. “

हेही वाचा – “स्मृतिभ्रंश हा एक असा आजार…” सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या सासूबाई…”

पुढे त्या म्हणाल्या की,”एक गंमत सांगते. जेव्हा त्याला ‘ताली’ वेब सीरिजच्या लूक टेस्टला जायचं होतं. तेव्हा मला त्यानं फोन केला होता. त्यावेळेस मी भलतीकडेच होते, तोही भलतीकडेच होता. मला म्हणाला, मला एक साडी आणि ब्लाउज पाहिजे. मी म्हटलं, नक्की भूमिका काय आहे? तुला साडी आणि ब्लाउज का हवाय? त्यानं सांगितल्यानंतर मी मुद्दाम लाल भडक रंगाची साडी आणि चमचमत ब्लाउज दारपाशी ठेवलं आणि मी माझ्या दुसऱ्या कामाला निघून गेले. मग त्यानं कोणाला तरी पाठवलं आणि ती साडी घेतली, अशी त्या लूक टेस्टची गंमत होती. पण त्याच रुपांतरित इतक्या सुंदर भूमिकेत झालं आणि त्यानं इतकी छान भूमिका निभावली. मला त्याचा खूप अभिमान आहे.”

हेही वाचा – “मी माझीच सांभाळू शकत नाही अन्….” चाहत्यानं पत्नीच्या समस्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर किंग खानचं उत्तर; म्हणाला…

दरम्यान, ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये सुव्रत व्यतिरिक्त बऱ्याच मराठी कलाकारांनी काम केलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव आणि नंदु माधव या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.