Premachi Goshta : छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. मालिकांमध्ये काम करणारे कलाकार घराघरांत लोकप्रिय होत असतात. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे. यामधील मुक्ता, सागर, सावनी, इंद्रा, मिहिका, मिहीर अशा कलाकारांना प्रेक्षकांनी आपलंस करून घेतलं आहे. या मालिकेत एकमेकींशी सतत भांडणं करणाऱ्या मुक्ता अन् सावनीचा ऑफस्क्रीन बॉण्ड मात्र खूपच वेगळा आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) या मालिकेत मुक्ता हे पात्र तेजश्री प्रधानने तर, सावनी हे पात्र अपूर्वा नेमळेकरने साकारलं आहे. ऑनस्क्रीन दोघी एकमेकींशी कितीही भांडताना दिसल्या तरीही या अभिनेत्रींचा ऑफस्क्रीन बॉण्ड तितकाच घट्ट आहे. मालिकेच्या शूटिंगमधून वेळ काढून दोघीही सध्या परदेशात फिरायला गेल्या आहेत. याचे फोटो या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली

हेही वाचा : श्रद्धा कपूरच्या Stree 2 ने बॉक्स ऑफिस गाजवलं; तीन दिवसांत १०० कोटी पार! तर, अक्षय कुमारच्या सिनेमावर पुन्हा फ्लॉपची पाटी

तेजश्री प्रधान व अपूर्वा नेमळेकर गेल्या दुबई ट्रिपला

‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) मालिकेत सावनी ही सागरची पहिली पत्नी असते. तिच्यापासून घटस्फोट घेत मुलीचा सांभाळ करण्यासाठी सागर मुक्ताशी लग्न करतो. मुलीवरच्या प्रेमापोटी लग्न होतं खरं पण, कालांतराने मुक्ता-सागर एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे, हर्षवर्धन आणि मिहिकाचं लग्न झाल्यामुळे कोळी कुटुंबाच्या घरी आसरा मिळवण्यासाठी सध्या सावनी मुलाचं कारण देत मुक्ता व सागरच्या प्रेमात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

मालिकेत एकमेकींचा राग करणाऱ्या मुक्ता अन् सावनी खऱ्या आयुष्यात मात्र अगदी जिवलग मैत्रिणी आहेत. त्यांच्या दुबई ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : “मालवणी भाषा माका कळता…”, म्हणत रितेश देशमुखने घेतला वैभवचा समाचार! रांगड्या गडीने हात जोडून मागितली माफी

अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघीही वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी या दोघींच्या फोटोंवर कमेंट करत या अभिनेत्रींच्या बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘बिग बॉस मराठी’ पाठोपाठ ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार नवीन मालिका; पाहा जबरदस्त प्रोमो

Premachi Goshta
Premachi Goshta : मुक्ता अन् सावनीची परदेशवारी

“अरे किती मैत्री आहे तुमच्यात…मालिकेत एकदम उलटं आहे”, “किती गोड…तुमची मैत्री अशीच कायम राहूदेत”, “दोघी दुबईत असताना प्रेमाची गोष्टमध्ये काय होणार?”, “सुंदर फोटो”, “फ्रेंडशिप गोल्स” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तेजश्री आणि अपूर्वामधील सुंदर बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे.

Story img Loader