काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, योगेश केळकर अशी अनेक तगडी कलाकार मंडळी असलेली ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं असून मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या मालिकेतील गोखले-कोळी कुटुंबात लग्नीनघाई सुरू आहे. मुक्ता-सागर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गोखले-कोळी कुटुंबाच्या रितीरिवाजानुसार मुक्ता-सागरचं लग्न होणार आहे. साखरपुडा, मेहंदी, हळद, सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्नसोहळा होणार आहे. उद्या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. अशातच मालिकेतील मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधानने राजची एक सवयी सांगत त्याला सल्ला दिला आहे.

हेही वाचा – मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धा वैशंपायन लवकरच चढणार बोहल्यावर; गायिकेच्या ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे फोटो आले समोर

लग्नसोहळ्या निमित्ताने मालिकेतील कलाकार विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील ‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने राजमधील एक सवयी सांगत त्याला सल्ला दिला.

तेजश्री म्हणाली, “त्याचा फोन त्याने नियमित पाहावा. मला हा सल्ला त्याला द्यायला आवडेल. कारण त्याची बायको माझी गोड मैत्रीण आहे. ती माझ्या फोनवर कॉल करते आणि म्हणते, ऐकना प्लीज माझ्या नवऱ्याला सांग फोन चेक कर. मी गेले तीन तास त्याला फोन करतेय. त्यामुळे मला त्याला हा सल्ला द्यायला आवडेल. त्याचा फोन मेकअप रुम किंवा मेकअप दादाच्या खिशात असतो. बायको तुला कॉल करते चेक कर असं म्हणावं, तेव्हा त्याचा फोन कुठेतरी पडलेला असतो. त्यामुळे मला जाहीरपणे त्याला सांगायला आवडेल, फोन वापर.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta fame tejashri pradhan gave this advice to raj hanchanale pps