अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. तिची कुठलीही मालिका, नाटक, चित्रपट असो प्रेक्षक वर्ग त्यावर भरभरून प्रेम करतो. मालिकाविश्वातील लाडकी सून असं तिला म्हटलं जात. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीनं तब्बल अडीच वर्षानंतर मालिकाविश्वात अलीकडेच जोरदार पुनरागमन केलं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी आली. इतर मालिकांप्रमाणे तेजश्रीची ही देखील मालिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतल्याचं सिद्ध झालं आहे. टेलिव्हिजन टीआरपीमध्ये या मालिकेनं ‘ठरलं तर मग’, ‘आई कुठे काय करते’ अशा लोकप्रिय मालिकांना मागे टाकतं अव्वल स्थान पटकावलं आहे. यानिमित्तानं तेजश्री सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. तिच्या या पोस्टनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आम्ही मुर्ख आहोत, तुम्हाला मतदान करतोय”; ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीचं सध्याच्या राजकारणावर परखड मत, म्हणाली…

तेजश्रीच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला होता. अखेर ४ सप्टेंबरपासून ही मालिका सुरू झाली आणि पहिल्याच आठवड्यात या मालिकेनं टेलिव्हिजन टीआरपीच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं. प्रेक्षकांचं हे भरभरून मिळणार प्रेम पाहून तेजश्री सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार अडकला लग्नबंधनात; ‘या’ अभिनेत्रीबरोबर घेतले सात फेरे

“आज थोडं व्यक्त व्हावसं वाटलं,” अशी पोस्ट करत तेजश्रीनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये तिनं लिहीलं आहे की, “कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू? तब्बल अडीच वर्षानंतर टेलिव्हिजनवर पुन्हा परतले. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं “आम्हाला तू आमच्या घरातलीचं वाटतेस टीव्हीमध्ये पाहिल्यावर” तेचं आपलं घरातलं माणूस अडीचं वर्षानंतर परत यावं, आपण त्याच्या गेल्या दिवसांपासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून रहावं, आणि घरी परतलेल्या “त्या” माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनचं यावं….तसचं काहीस माझ्या मनाचं झालयं. आज पहिल्या भागाला (एपिसोडला) तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर… “

हेही वाचा – “१४ वर्ष अयशस्वी करिअर…” ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीला स्वामींची आली अशी प्रचिती, म्हणाली…

“इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले.. पडले, धडपडले, पुन्हा उठले ..आधाराला फक्त काम होतं… शाश्वत फक्त काम होतं, इतकी वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं… सांगावसं वाटलं , ‘मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची.. जो कधी ‘लक्ष्मी’साठी, कधी ‘जान्हवी’साठी, कधी ‘शुभ्रा’साठी आणि आता ‘मुक्ता’साठी ढळतो.. ‘ आणि हिचं जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे, यापुढे ही देत राहील…पुन्हा एकदा … मनापासून आभार…असेचं कायम माझ्या पाठीशी राहा. बाकी आनंदी आयुष्य आहेचं,” असं तेजश्रीनं लिहीलं आहे.

हेही वाचा – “१४ वर्ष अयशस्वी करिअर…” ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीला स्वामींची आली अशी प्रचिती, म्हणाली…

दरम्यान, ऑनलाइन टीआरपीमध्येही ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर चांगलीच वरचढ ठरली आहे. मधुराणी प्रभुलकरच्या या मालिकेला मागे टाकतं तेजश्रीची मालिका ऑनलाइन टीआरपीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर ‘ठरलं तर मग’ ही मालिका आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta fame tejashri pradhan shared a post to express his gratitude to the audience pps