मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. आजवर बऱ्याच कलाकारांमध्ये ऑनस्क्रीनप्रमाणे आपण ऑफस्क्रीन देखील मैत्रीपूर्ण बॉण्डिंग असल्याचं पाहिलं आहे. अभिनेत्री श्वेता मेहेंदळे व अभिनेता यश प्रधान यांच्यात देखील गेल्या अनेक वर्षांपासून छान अशी मैत्री आहे. परंतु, सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्यांना अत्यंत वाईट अनुभवाचा सामना करावा लागला होता. याविषयी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता यश प्रधान याने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यश प्रधान यासंदर्भातील अनुभव सांगताना म्हणाला, “आम्ही एकदा सुला वाइन्सला गेलो होतो. तेव्हा मला कमी अक्कल असल्यामुळे भरपूर फोटो काढून सोशल मीडियावर टाकणं हा माझा उपक्रम होता. आमचा तेव्हा काढलेला फोटो संशयाला कारणीभूत ठरला होता. यातली पहिली अफवा अशी होती की, श्वेता आणि मी एकाच खोलीत आहोत… सकाळी एक झाडूवाला आला त्याला मी नेकेड ( नग्न ) अवस्थेत सापडलो. ही आमच्याबद्दलची सगळ्यात पहिली अफवा होती…ही अफवा पसरल्यावर मी माझ्या बायकोला फोन केला होता. तिला सगळं सांगितलं…हे बघ अशी-अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. आता इंडस्ट्रीमध्ये आहोत तर अफवा कानावर यायला सुरुवात झाली आहे. ती सुद्धा यावर खूप हसली होती.”

हेही वाचा : अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक, अडीच किलो कोकेन जप्त, अधिकारी माहिती देत म्हणाले…

अभिनेता यश प्रधानचं इंडस्ट्रीबद्दल भाष्य

यश प्रधान पुढे म्हणाला, “मी या क्षेत्रात २०१६ च्या दरम्यान आलो. मला माहिती होतं, इथे फक्त तीनच विरंगुळे आहेत. पहिलं क्रिकेट, दुसरं गॉसिप आणि तिसरं सेक्स या तीन विरंगुळ्यांमध्येच एकमेकांना बघितलं जातं. कारण, लोक १२-१२ तास काम करतात. इथे गॉसिप चालतंच… मी या सगळ्या गोष्टी खूप आधीपासून पाहिल्या आहेत.”

हेही वाचा : ‘या’ अभिनेत्याने राधिका-अनंतची करून दिली ओळख? मुकेश अंबानींनी त्याला ३० कोटींची दिली भेटवस्तू? त्याचे वडील म्हणाले…

अभिनेता यश प्रधान

दरम्यान, यश प्रधानच्या कामाबद्दल सांगायचं झालं, यापूर्वी तो ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत झळकला होता. तर सध्या तो ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत हर्षवर्धन म्हणजेच सावनीच्या प्रियकराची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो नकारात्मक भूमिकेत झळकत आहे. यशशिवाय या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.