स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील मुक्ता हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच मालिकेतून अचानक एक्झिट घेतली आहे. त्यानंतर आता या मालिकेत मुक्ता हे पात्र अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारत आहे. मालिकेत सध्या आदित्यची कस्टडी घेण्यासाठी मुक्ता आणि सागर प्रयत्न करत आहेत, मात्र यावेळीही सावनीचे कटकारस्थान काही थांबलेले नाही.

आदित्यच्या कस्टडीच्या बदल्यात सावनीला पैसे देण्यात येणार होते. ॲग्रिमेंटच्या कागदपत्रांवर सही करताना सावनीने सागरचं लक्ष विचलित केलं. तसेच त्या ॲग्रिमेंटच्या कागदपत्रांमध्ये थेट आदित्यच्या बदल्यात सई तिच्याकडे राहणार असा कागद त्यात ठेवला. कागदपत्रांवर सह्या करताना सावनी सागरला सतत राग येईल असं म्हणत होती. शेवटी रागाच्या भरात सागर सावनीच्या जाळ्यात फसला आणि त्याने न वाचता पेपर्सवर सह्या केल्या.

त्यामुळे सावनी थेट सईला घेऊन जाण्यासाठी सागरच्या घरी पोहचली. तिने सर्व कागदपत्र दाखवले आणि सईला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आता या सर्वांमुळे मुक्ता फार संतापली आणि खचून गेली आहे. आपली लेक आपल्यापासून दुरावू नये यासाठी ती त्रागा करत आहे. या मालिकेचा एक नवीन प्रोमोसुद्धा समोर आला आहे. त्यामध्ये मुक्ता थेट सागरच्या कानशि‍लात मारताना दिसत आहे.

प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुक्ताला सागरचा प्रचंड राग आला आहे. घडलेला प्रकार लक्षात आल्यावर सागर मुक्ताची माफी मागतो तेव्हा मुक्ता थेट त्याच्या कानाखाली मारते. तसेच रडत म्हणते की, रागाच्या भरात सागर तुम्ही पुन्हा मोठी चूक केली. तुमच्या रागाने आपला घात केला आहे, एका चुकीने माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ होऊन बसला आहे. मालिकेचा हा प्रोमो पुढील भागाचा आहे.

कायद्याच्या मदतीने आणि सागरच्या डोळ्यात धुळफेक करून सावनीने पुन्हा एकदा आदित्यला मिळवलं आहे. प्रोमोमध्ये पुढे आदित्य सावनीकडे आलेला दिसत आहे. तसेच सावनीला घट्ट मिठी मारून तो तिची माफीही मागत आहे.

मालिकेत आदित्यला मिळवण्यासाठी सईला गमवावं लागणार हे समजल्यावर मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण मुक्ताचा सईवर फार जास्त जीव आहे. सई आपल्यापासून दूर जाणार ही कल्पनाही तिला सहन होत नाहीये. त्यामुळे सावनीच्या या प्लॅनमधून मुक्ता सागरच्या दोन्ही मुलांना स्वत:कडे कशी आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader