‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या सातत्याने चर्चेत आहे. या मालिकेने टेलिव्हिजन टीआरपीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ‘स्टार प्लस’ या वाहिनीवरील ‘ये हे मोहब्बते’ या मालिकेचा हा रिमेक आहे. नुकतंच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने याबद्दल भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान ही प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यात खलनायिकेची भूमिका साकारली आहे. नुकतंच अपूर्वा नेमळेकरने ‘टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘ये हे मोहब्बते’ मालिकेचा रिमेक आणि भूमिका याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : नकारात्मक भूमिका असतानाही ‘प्रेमाची गोष्ट ‘मालिकेला होकार का दिला? अपूर्वा नेमळेकर म्हणाली, “बिग बॉसनंतर मी…”

“‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ‘ये है मोहब्बते’ या हिंदी मालिकेचा रिमेक आहे, याची आता प्रत्येकालाच माहिती झाली आहे. या मालिकेतही तीच पात्र आहेत. या मालिकेच्या हिंदी रिमेकमध्ये अनिता हसनंदानी हिने शगुन हे पात्र साकारले होते”, असे अपूर्वा नेमळेकरने म्हटले.

“आता तीच भूमिका मी मराठीत साकारत आहे. यात माझ्या पात्राचे नाव सावनी असे आहे. सावनीची भूमिका साकारण्यासाठी मी माझ्या साड्या, दागिने याबरोबरच केस आणि स्टाईलवरही लक्ष केंद्रित करत आहे. यापूर्वी मी असं काही केलं नव्हतं”, असेही तिने सांगितले.

आणखी वाचा : “मला तिच्याबरोबर…”, अपूर्वा नेमळेकरने सांगितला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली “आम्ही एकत्र…”

दरम्यान अपूर्वा नेमळेकर ही ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. त्यानंतर ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात झळकली. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून तिने ओळख निर्माण केली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta marathi serial remake of yeh hai mohabattein hindi said apurva nemlekar during interview nrp