स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मालिकेमध्ये सध्या सईला घरी आणण्यासाठी मुक्ता मोठी धडपड करताना दिसत आहे. सावनीने फसवून सागरच्या सह्या घेतल्याने आता मुक्ताही सावनीला फसवून एका कागदावर तिच्या सह्या घेणार आहे. मालिकेत मुक्ता आणि सईमाऊ या दोघींची केमिस्ट्री फार छान आहे. पडद्यावर दोघींचं प्रेम प्रेक्षकांना फार आवडतं. मात्र, पडद्यामागेही या दोघी एकमेकींना खूप जीव लावतात. त्याचाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

मालिकांमध्ये काम करताना कलाकारांची एकमेकांसह चांगलीच मैत्री जमते. त्यामुळे पडद्यामागेही हे कलाकार एकमेकांची काळजी घेताना दिसतात. असंचं काहीसं मुक्ता आणि सईमाऊ म्हणजेच स्वरदा ठिगळे आणि इरा परवडे यांचंही नातं आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच या दोघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये मुक्ता आणि सई दोघीही एक गेम खेळत आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सईमाऊला मुक्ताआईबदद्ल प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सई तिच्या मुक्ताआईला किती ओळखते हे या खेळातून सिद्ध करायचं असतं. त्यामुळे व्हिडीओमध्ये सईला मुक्ताआईच्या पर्समध्ये कोणकोणत्या वस्तू असतात, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर उत्तर देताना चिमुकली सई थोडा विचार करते आणि पहिली वस्तू चार्जर असणार, असं सांगते. तिनं ओळखलेली पहिलीच गोष्ट बरोबर असल्यानं मुक्ता फार खूश होते.

पुढे सई आणखी विचार करते आणि लिपस्टिक अशी दुसरी वस्तू असल्याचं ओळखते. मात्र, मुक्ताच्या बॅगेत लिपस्टिक नाही, तर लिप बाम आहे, असं ती सईला सांगते. पुढे सई घराच्या किल्ल्या मुक्ताआईच्या बॅगेत असल्याचं ओळखते. आता चिमुकल्या सईला आणखी वस्तू पटपट ओळखता याव्यात म्हणून मुक्ता तिला काही हिंट देते. “केस मोकळे सोडल्यावर आपल्याला गरम होतं, तेव्हा आपल्याला काय हवं असतं?”, असं ती सईला सांगते. त्यावर सई पटकन, “केसांचा क्लिप”, असं उत्तर देते.

या व्हिडीओमध्ये सईने एकूण सात वस्तू ओळखते. तिनं वस्तू ओळखल्यावर मुक्ताही फार आनंदी होते. तसेच “सई मुक्ताआईला मुक्तापेक्षाही जास्त ओळखते”, असं मुक्ता या व्हिडीओमध्ये पुढे म्हणते. सईनं या गेम छान खेळल्यानं मुक्ता पुढे दिला गिफ्ट म्हणून एक चॉकलेटही देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Story img Loader