मालिका, चित्रपट आणि नाटक यांमध्ये आपल्या अभिनयाने प्रत्येक कलाकार रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. या कलाकारांचा चाहता वर्गही मोठा असतो. आपला आवडता कलाकार रुपेरी पडद्यामागे त्याच्या रोजच्या आयुष्यात काय करतो, काय नाही? हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. छोट्या पडद्यावरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील चिमुकल्या सईचे लाखो चाहते आहेत. सईला नेमकी कोणती मिठाई आवडते तुम्हाला माहीत आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नुकताच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सई आणि मुक्ता एकमेकींशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यात सईला कोणती मिठाई सर्वांत जास्त आवडते याची माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुक्ता तिच्या खोलीतून बाहेर येते आणि शूटिंगसाठी जाऊयात, असं म्हणते. त्यानंतर ती मालिकेतील मिहिकाला भेटते. पुढे त्याच खोलीत सई येते. सई आल्याबरोबर मुक्ताला घट्ट मिठी मारते. व्हिडीओमध्ये पुढे सईची सगळ्यात आवडती डिश कोणती, असा प्रश्न विचारला जातो.

त्यावर मुक्ता म्हणते, “मिठाईमध्ये काय आवडतं मी सांगू” आणि ती मलाई बर्फीचं नाव घेते. त्यावर सई तिला हातवारे करून काजू कतली, असं सांगते. या व्हिडीओनुसार सई कोळी म्हणजेच इरा परवाडेला मिठाईमध्ये काजू कतली आणि मलाई बर्फी आवडते, असं समजत आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुक्ता आणि सई या दोघींची केमिस्ट्री सर्वांना आवडते. मुक्ता सईची जन्मदाती आई नाही. मात्र, तरीही ती सईवर अगदी आईप्रमाणे माया करते. तसेच सईसुद्धा मुक्ताला आई म्हणूनच हाक मारते. ऑन स्क्रीन मायलेकीचं हे नातं ऑफ स्क्रीनसुद्धा फार छान आहे हे या व्हिडीओमधून दिसत आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सध्या मुक्ता आणि सागर आदित्यला मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. सावनीने सागरला फसवून आदित्यची कस्टडी मिळविण्यासाठी वेगळी कागदपत्रे अॅग्रीमेंटमध्ये जोडली आहेत. त्यावर सागरनेसुद्धा सही केली आहे. त्यावर आदित्यच्या बदल्यात सई सावनीला मिळणार, असं लिहिण्यात आलं आहे. मात्र, मुक्ता आणि सई या दोघींचं नातं फार घट्ट आहे. “सईशिवाय मी जगू शकत नाही”, असं मुक्ता सागरला सांगते. त्यामुळे सागर सावनीला आदित्यला घेऊन जा, असं सांगतो. आदित्यला मिळविण्यासाठी आता मुक्ता आणि सागर पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.