प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या आदित्यची कस्टडी कुणाला मिळणार असा सिक्वेन्स सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सावनी आदित्यला मिळवण्यासाठी आणि मुक्ता सागरला धडा शिकवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे मुक्ताने शक्कल लढवून सावनीचा यावेळचा डावसुद्धा उधळून लावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोर्टात आदित्यची कस्टडी सागरला मिळणार की सावनीला यावरून युक्तीवाद सुरू आहे. आदित्य आपल्याला मिळावा तसेच सागरकडून त्याच्या पालनपोषणासाठी भरमसाठ पैसे मिळावेत असा प्लॅन सावनीने केला होता. त्यासाठी पत्रकारांसमोर तिने सागर किती वाईट वडील आहे हे सांगितलं.

सईच्या जन्मावेळी डॉक्टरांनी बाळ किंवा आई वाचेल असं सांगितलं होतं. त्यावेळी सागरने बाळाच्या आईला वाचवा म्हणजे सावनीला वाचवा असं म्हटलं होतं. तसेच अबॉशन पेपरवर सही केली होती. मात्र, सावनीने याचा गैरवापर करत पत्रकारांना खोटे सांगितले आणि त्याला फसवते. पुढे सईने टीव्हीवर ही बातमी पाहिली आणि तिच्या मनात सागरबद्दल वाईट भूमिका निर्माण झाली. सईने थेट सागरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची परीक्षाही घेतली. यावेळी सागर साईच्या परीक्षेत पास झाला आणि त्याने पुन्हा एकदा त्याच्या लाडक्या लेकीचा विश्वास जिंकला.

मालिकेत पुढे सागरने मुक्ताच्या प्लॅननुसार हरवर्धनचा आवाज काढून सावनीची दिशाभूल केली. त्याने सावनी संतापली आणि तिने हर्षवर्धन समजून सावनी समोर सर्व काही खरं सांगितलं. मुक्ताने यावेळी पत्रकारांना बोलावलं होतं. त्यामुळे सर्वांसमोर सत्य आल्याने आता आदित्यची कस्टडी सागरला मिळणार आहे.

मात्र, या सर्वांमुळे सावनी आणखी जास्त संतापली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोत आदित्य सागर आणि मुक्ताला मिळणार परंतू सावनी सईला घेऊन जाणार असे दिसत आहे. नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवीन प्रोमो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये सावनी सागरच्या हातात कराराचे काही कागद देते आणि म्हणते, “या करारानुसार आदित्यची कस्टडी तुम्हाला दिल्याच्या बदल्यात आता सई माझ्याकडे राहणार.” तसेच सावनी सईला मुक्तापासून दूर करते आणि तिचा हात ओढत तिला सोबत घेऊन जाते. मात्र, तितक्यात सई सावनीच्या हाताला कडकडून चावते आणि स्वत:ची सुटका करून पुन्हा मुक्ताकडे धावत येते.

त्यावर “कागदाचा हा एक तुकडा माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून कधीच दूर करू शकणार नाही”, असं मुक्ता सावनीला सांगते. मालिकेच्या या प्रोमोमध्ये सावनीने मुक्ता आणि सागरला त्रास देण्यासाठी आणखी एक नवं कारस्थान शोधल्याचं दिसत आहे. सईला मिळवण्यासाठी तिच्याकडे कराराचे कागदपत्रदेखील आहेत. त्यामुळे आता मुक्ता यावेळी काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा हा महाएपिसोड रविवार २ फेब्रुवारी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta new promo video sawani will alienate sai from mukta and sagar rsj