‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्यातील वेगवेगळी आव्हानं आणि संकटं काही थांबायचं नाव घेत नाही. हर्षवर्धनने फसवल्यानंतर बिथरलेल्या सावनीला मुक्ताने आधार देत घरी आणलं. सावनीचं येणं कोळी कुटुंबाला कधीच मान्य नव्हतं, मात्र सावनी आदित्यची आई आहे आणि तो या घरचा मुलगा आहे. निदान आदित्यसाठी तरी आपण सावनीला आपल्या घरी राहू द्यायला हवं, कारण कोणताच मुलगा आपल्या आईशिवाय नाही राहू शकतं; अशा शब्दात मुक्ता, सागर आणि कोळी कुटुंबाला समजावते. सावनीचा धूर्तपणा कोळी कुटुंबाने या आधीच अनुभवला होता, त्यामुळे फक्त आदित्यवरच्या प्रेमाखातर नाईलाजास्तव सावनीला घरी ठेवण्याच्या मुक्ताच्या निर्णयाला ते पाठिंबा देतात.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
Savlyachi Janu Savli
Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

मात्र, जी बदलेल ती सावनी कसली? हर्षवर्धनशी होणारं आपलं लग्न मुक्ता आणि सागरमुळे मोडलं, हा राग मनात ठेवत ती मुक्ता आणि संपूर्ण कोळी कुटुंबावर सूड घेण्याची एकही संधी सोडत नाही. सागर आणि तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त करून सागरला निनावी फुलांचा गुच्छ ती पाठवते. समोर असलेला आदित्य हे पाहतो. आपल्या सावनी मम्मा आणि सागर पप्पांच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी पाहिजेच, असा हट्ट तो सागरजवळ करतो. आदित्यचं मन मोडू नका असं मुक्ता सागरला सांगते आणि त्याच पार्टीत मुक्ता सावनीचा डाव सावनीवरचं उलटवून लावते. मालिकेच्या या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधली लॉली, शितली, शालू अन्…; नम्रता संभेरावच्या वाढदिवशी प्रसाद खांडेकरची हटके पोस्ट

मुक्ता देणार सावनीला सडेतोड उत्तर

येत्या रविवारी मालिकेचा महाएपिसोड येणार आहे. याबाबतचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. महाएपिसोडमध्ये मुक्ताच्या मंगळागौरीचा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमात सावनी मुक्तासोबत मंगळागौरीचा खेळ खेळताना दिसत आहे. सावनी म्हणते की, “माझा संसार तू मोडलास का गं?”असं म्हणताना ती खाली पडते. त्यावर ‘पडली रे पडली’ म्हणत सगळ्याजणी तिला हसतात. रागावलेली सावनी कोळी कुटुंबाच्या प्रॉपर्टीची कागदपत्रं सगळ्यांना दाखवते. सावनी म्हणते की, “सागरने सगळी प्रॉपर्टी आदित्यच्या नावावर केली आहे. आदित्य माझा मुलगा आहे, त्यामुळे या प्रॉपर्टीची मालकीण आता मी आहे.” हे ऐकताच सागर, मुक्ता आणि कोळी कुटुंबाला धक्का बसतो.

हेही वाचा – ठरलं तर मग : सायलीची मृत्यूशी झुंज तर, प्रतिमाचा जीव धोक्यात…; ‘या’ दिवशी असणार महाएपिसोड; पाहा जबरदस्त प्रोमो

मुक्ता सागरला म्हणते की, “आदित्य फक्त निमित्त आहे, सावनीची सागरच्या प्रॉपर्टीवर नजर आहे. सावनीच्या हातातून कागदपत्र हिसकावून घेत मुक्ता ते फाडून टाकते. सावनीचे कारनामे पाहून संतापलेली मुक्ता सावनीला म्हणते की, आदित्यचा वापर करून तू प्रॉपर्टी बळकवायला बघत आहेस, सावनी तू आई या नात्याला कलंक आहेस.” येत्या भागात आता मालिकेत मुक्ता आणि सागरचं नातं कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा महाएपिसोड रविवारी म्हणजेच १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता पाहायला मिळणार आहे.