Premachi Goshta Serial New Promo : ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ही मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान मध्यवर्ती भूमिकेत होती. मात्र, काही दिवसांआधीच तेजश्रीने मालिका सोडल्याची बातमी सर्वांसमोर आली आणि यामुळेच अभिनेत्रीच्या सर्व चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती. आता तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेजश्रीने मालिका का सोडली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आता नव्या मुक्ताची एन्ट्री झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री स्वरदा ठिगळेने मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर करत मुक्ता साकारण्यास सज्ज झाल्याची माहिती प्रेक्षकांना दिली होती. आता या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आली नवीन मुक्ता

‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सईच्या वाढदिवसाचं सेलीब्रेशन हा सीक्वेन्स चालू आहे. आपल्या वाढदिवसाला दादाने म्हणजेच आदित्यने यावं अशी सईची मनापासून इच्छा असते पण, सावनी त्याला सोडत नाही… तरीही आदित्य येतो. या सगळ्यात आता सावनी मोठा डाव खेळणार आहे. सावनी बातम्यांमध्ये असं दाखवते की, सागर कोळी यांना कधीच मुलगी नको होती…सईच्या जन्माआधी गर्भपाताचा विचार केला गेला होता. या गोष्टी सईच्या कानावर जातात आणि ती रागात घर सोडून जाते.

सई रडत-रडत रस्त्यावरून जात असते. याचवेळी मागून गाडी येते. त्याच क्षणाला मालिकेत नव्या मुक्ताची एन्ट्री होते. मुक्ता अगदी योग्यवेळी येऊन सईचा जीव वाचवते. मुक्ताला पाहून सई तिला घट्ट मिठी मारते. या प्रोमोमध्ये स्वरदा ठिगळेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेत स्वरदाची एन्ट्री १७ जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.

दरम्यान, यापूर्वी ‘स्टार प्रवाह’च्या मकर संक्रात विशेष सोहळ्याला सागरबरोबर नव्या मुक्ताने म्हणजेच स्वरदाने उपस्थिती लावली होती. आता नव्या मुक्ताच्या येण्याने मालिकेत ( Premachi Goshta ) काय बदल घडलणार? इथून पुढे सावनीला मुक्ता कशी धडा शिकवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.