Prithvik Pratap Wedding : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वीच पृथ्वीकने नव्या घरात आपल्या कुटुंबीयांच्या सोबतीने गृहप्रवेश केला होता. यानंतर त्याने नवीकोरी गाडी खरेदी केली. सामान्य कुटुंबातून आलेल्या पृथ्वीकने आजवर पाहिलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवलं. चाहत्यांना दोन आनंदाच्या बातम्या आधीच दिलेल्या असताना २५ ऑक्टोबरला लग्नाचा फोटो शेअर करत अभिनेत्याने सर्वांना सुखद धक्का दिला.

पृथ्वीक प्रतापने २५ ऑक्टोबर दिवशी त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या प्राजक्ता वायकुळशी लग्नगाठ बांधली. दोघांचा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. पण, या सगळ्यात पृथ्वीक-प्राजक्ताच्या लग्नाचा लूक सर्वांच्या विशेष पसंतीस उतरला होता. अभिनेत्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर नेसलं होतं. तर, प्राजक्ताने ऑफ व्हाइट गोल्डन रंगाची साडी नेसली होती. दोघांनी या खास दिवशी एकमेकांना मोगऱ्याच्या फुलांच्या वरमाळा घातल्या होत्या. कलाविश्वातील कलाकारांसह पृथ्वीकच्या ( Prithvik Pratap) लाखो चाहत्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला.

हेही वाचा : लग्नाच्या १४ व्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश! विवेक ओबेरॉयचं पत्नीला खास गिफ्ट, प्रियांका आहे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी

पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट

पृथ्वीकचा ( Prithvik Pratap ) लग्नसोहळा पार पडल्यावर त्याच्या पत्नीबरोबरचे त्याचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे दोघंही फार पूर्वीपासून एकमेकांना ओळखतात. याबद्दल आता स्वत: पृथ्वीकने एका पोस्टमधून खुलासा केला आहे. “३० ऑक्टोबर २०१३ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत… माझ्या आयुष्यातील ११ वर्षांच्या भावभावनांचं व्हिज्युअल रीप्रेझेंटेशन” यावरून पृथ्वीक आणि प्राजक्ता लग्नाआधी ११ वर्षे एकमेकांबरोबर होते हे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : Video: ‘मुंज्या’, ‘स्त्री २’नंतर आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या ‘थामा’ चित्रपटाची घोषणा, पाहायला मिळणार थरारक प्रेम कहाणी

हेही वाचा : Priya Bapat – प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”

पृथ्वीकने ( Prithvik Pratap ) या पोस्टला ‘माझे राणी माझे मोगा’ हे महानंदा चित्रपटातलं जुनं कोकणी गाणं लावलं आहे. नेटकऱ्यांनी या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, पृथ्वीकने लग्न केल्यावर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लग्नात होणारा अवाढव्य खर्च टाळून पृथ्वीक-प्राजक्ताने दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या निर्णयाचं देखील सर्वांनी कौतुक केलं आहे.