‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातला प्रत्येक विनोदवीर आता घराघरात पोहोचला आहे. प्रत्येकाने प्रेक्षकांच्या मनात आपल्या विनोद शैलीमुळे वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकही या विनोदवीरांवर भरभरून प्रेम करताना पाहायला मिळत आहे. पण अशा या लोकप्रिय कार्यक्रमात एक चिडका बिब्बा आहे. तो कोण? याचा खुलासा अभिनेते समीर चौघुले यांनी केला आहे.

हेही वाचा – भक्ती बर्वे: ‘सळसळत्या ऊर्जेची फुलराणी’

kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Atul Parchure
“जायच्या अगदी दोन महिन्यांआधी मला फोन करून …”, मिलिंद गवळींनी सांगितली अतुल परचुरेंची आठवण; म्हणाले, “फारच वाईट…”
mukesh khanna reacts on sonakshi sinha post
“आपल्या संस्कृतीत…”, सोनाक्षी सिन्हा भडकल्यावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण; शत्रुघ्न सिन्हांचे नाव घेत म्हणाले…
What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”
nana patekar amitabh bachchan
नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलच्या पोलखोल या सेगमेंटमध्ये समीर चौघुले यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये कोण चिडका बिब्बा आहे? याबाबत सांगितलं. समीर चौघुले म्हणाले की, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये चिडका बिब्बा पृथ्वीक प्रताप आहे. कारण तो पटकन चिडतो, त्याला कळतं नाही. मग त्याला समजवावं लागतं, शांत हो. चिडू नकोस. शांत हो. रिलॅक्स. विशेषतः जे मीडियासमोर जाण्याची शक्यता तिथे जरा शांत बोल. कारण काय असतं हल्ली एखादा सेलिब्रिटी बोलतोय आणि त्याचा अर्थ वेगळा काढणारी अनेक मंडळी आहेत. तेवढा एक पॅच हायलाइट करतात आणि लोक त्या पद्धतीने ट्रोल करतात. हे होऊ नये कारण तो फार ब्रिलियंट आहे. अत्यंत गुणी कलावंत आहे. त्यामुळे चिडताना त्यानं स्वतःला आवरलं तर खूप चांगलं होईल.”

हेही वाचा – “प्लीज मराठी चित्रपटात घ्या, मी उत्तम मराठी बोलते”; शाहरुख खानबरोबर ‘जवान’ चित्रपटात काम करणाऱ्या गिरीजा ओकचं वक्तव्य

दरम्यान, पृथ्वीक हा शाहरुख खानचा जबरा फॅन आहे. त्यानं नुकताच ‘जवान’ चित्रपटातील शाहरुखचा टक्कल असलेला लूक रीक्रिएट केला होता. या लूकमध्ये शाहरुख चित्रपटात मेट्रोमध्ये ‘बेकरार करके हमे..’ गाण्यावर डान्स करताना दिसतो. तसाच डान्स पृथ्वीकने केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Story img Loader