Maharashtrachi Hasya Jatra Fame Prithvik Pratap Wedding : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. शुक्रवारी ( २५ ऑक्टोबर) दुपारी आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत पृथ्वीकने त्याच्या तमाम चाहत्यांना सुखद दिला आहे. यापूर्वी अभिनेत्याला अनेक मुलाखतींमध्ये लग्नाबद्दल प्रश्न विचारले जायचे. अखेर विवाहसोहळ्यादरम्यानचे काही खास फोटो शेअर करत पृथ्वीकने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या मराठी मनोरंजन विश्वातून पृथ्वीक प्रतापवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांनी देखील त्याला खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच पृथ्वीकचा ( Prithvik Pratap ) जवळचा मित्र असलेल्या अभिनेता प्रथमेश परबच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : पृथ्वीक प्रतापच्या आयुष्यात आली प्राजक्ता! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिल्या शुभेच्छा; शिवाली परब म्हणाली…

प्रथमेश परबची खास पोस्ट

पृथ्वीक अन् प्राजक्ता यांचा लग्नसोहळा पार पडल्यावर नवजोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी खास प्रथमेश परब गेला होता. या दोघांबरोबर त्याने सुंदर असा फोटो काढला. या फोटोला कॅप्शन देताना प्रथमेश लिहितो, “खूप खूप शुभेच्छा… मेरे भाई पृथ्वीक”. याशिवाय प्रथमेशची पत्नी क्षितीजा घोसाळकर हीने देखील पृथ्वीक-प्राजक्तासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

मोठ्या थाटामाटात हा सोहळा का केला नाही असं विचारल्यावर पृथ्वीक ( Prithvik Pratap ) म्हणाला, “मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यांच्या सोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जवाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे असं आम्हाला वाटतं”

पृथ्वीक प्रतापसाठी प्रथमेशची खास पोस्ट ( Prithvik Pratap )

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप ( Prithvik Pratap ) घराघरांत लोकप्रिय झाला. सुरुवातीच्या काळापासून संघर्ष करत त्याने आज यशाचा एवढा मोठा पल्ला गाठला आहे. नुकतीच अभिनेत्याच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली होती ती म्हणजे पृथ्वीकने स्वत:ची पहिली गाडी खरेदी केली होती. आता अभिनेता लग्नबंधनात अडकल्यावर त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvik pratap maharashtrachi hasya jatra fame actor wedding prathamesh parab shares photo sva 00