‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा विनोदवीर पृथ्वीक प्रताप अलीकडे त्याच्या रिल्समुळे चर्चेत असतो. पृथ्वीकने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पृथ्वीक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. सध्या पृथ्वीकचा इन्स्टाग्रामवरील एक व्हिडीओ चर्चेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पृथ्वीकने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या करिअरचा प्रवास दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला तो ऑडिशन देताना दिसतोय. नंतर भरगच्च प्रेक्षकांनी भरलेल्या एका हॉलमध्ये तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसतोय. त्यानंतरच्या एका क्लिपमध्ये त्याला भेटायला चाहत्यांची तुफान गर्दी झालेली दिसतेय. तर व्हिडीओच्या शेवटी तो त्याच्या आईबरोबर रेड कार्पेटवर तिच्याशी गप्पा मारताना दिसतोय. पृथ्वीकचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता.
हा व्हिडीओ शेअर करत पृथ्वीकने कॅप्शन दिलं आणि लिहिलं, “जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत त्या प्रत्येक मेहनती कलाकाराने हे लक्षात ठेवा की, आशा कधीही गमावू नका.”
पृथ्वीकने पुढे लिहिलं “अलीकडेच बिगबॉस वरून श्री रणवीर शौरेचा व्हायरल व्हिडिओ पाहिला आणि तेव्हाच मी लोकांना ‘प्रत्येत माघार ही सर्वात मजबूत पुनरागमनाने भरून काढली जाते’ हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला.”
“आपण सर्वजण आपापल्या जीवनात संघर्ष करत आहोत पण त्याचा आपल्या प्रवासावर परिणाम होणार नाही याची खात्री करा. मेहनत करत राहा.” पृथ्वीकने असंही लिहिलं.
हेही वाचा… विकी कौशलच्या फोनचा वॉलपेपर होतोय व्हायरल, फोटोमध्ये आहे कतरिनाच्या बालपणाची आठवण
पृथ्वीकने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “या सर्व प्रसिद्धीसाठी तू खरोखरच पात्र आहेस. तुझ्या प्रयत्न आणि कौशल्यांमुळे आज तू इथे आला आहेस. तुला स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याच्या सर्व संधी मिळोत हीच इच्छा.” तर दुसर्याने मेहनती तर तू आहेसच पण तू खूप हुशारही आहेस आणि हास्यजत्रेत तू खूप छान काम करतोस. ऑल द बेस्ट!” अशी कमेंट केली.
तर एकाने “कहानी पूरी फिल्मी है “अशी कमेंट केली. तर “भाई अभी रुलाएगा क्या” अशी कमेंट एका चाहत्याने केली.
दरम्यान, पृथ्वीक प्रतापच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटानंतर पृथ्वीक आता दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. ‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती असून, त्यामध्ये बरेच मराठी कलाकार दिसणार आहेत.