‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या जेनिफर मिस्त्री, मोनिका भदौरिया यांसारख्या कलाकारांनी असित कुमार मोदींवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ‘तारक मेहता…’मध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रिया अहुजानेही या प्रकरणी भाष्य करत निर्मात्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. निर्मांत्याबरोबर झालेल्या प्रचंड वादानंतर आता प्रिया अहुजाने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत अधिकृत राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’चे चाहतीने केलेले कौतुक पाहून केदार शिंदे भारावले; कमेंट करत म्हणाले, “स्वामी कृप्रेने…”

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार प्रिया म्हणाली, “गेल्या ८ महिन्यांपासून मला मालिकेच्या निर्मात्यांकडून एकदाही कॉल आलेला नाही. मी या मालिकेचा भाग आहे की नाही याबाबतही माहिती दिलेली नाही. निर्माते असित मोदी आणि प्रोडक्शन हेड सोहेल रमाणी यांच्याशी संपर्क साधून मी अनेकदा मालिकेसंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझ्या एकाही मेसेजला उत्तर दिलेले नाही.”

हेही वाचा : Video : “सासूबाई हव्या तर अशा…”, कियारा अडवाणीचा रॅम्प वॉक पाहून सिद्धार्थच्या आईने दिली फ्लाइंग किस, व्हिडीओ व्हायरल

प्रिया पुढे म्हणाली, “निर्मात्यांनी गेले बरेच दिवस मला एकदाही शोमध्ये पुन्हा येण्यासाठी विचारणा केलेली नाही. याचा माझ्या करिअरवर प्रचंड परिणाम होऊ लागला. कारण, आता मी ज्या निर्मात्यांना भेटते त्यांना मला माझ्या कराराबाबत सांगावे लागते. जे कलाकार एखाद्या शोमध्ये अनेक वर्ष करारबद्ध असतात त्यांच्याबरोबर पटकन कोणीही काम करत नाही. पण, गेले काही महिने मी “तारक मेहता…” या मालिकेचा भाग आहे की नाही याची कल्पना नसल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा : प्राजक्ता माळीने लोकप्रिय अभिनेत्रीला भेट दिला खास दागिना; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मला तुझ्या मनातलं…”

“आता या मालिकेतून मी अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. यापुढे मी या शोचा भाग नसेन. मी वैतागून शो कधी सोडते याची निर्माते गेले कित्येक दिवस वाट पाहत होते. मला खात्री आहे की, माझ्या राजीनाम्यानंतर आता दोन दिवसांत ते या भूमिकेसाठी आणखी एका अभिनेत्याला आणतील आणि नेमके तेच झाले. रिटाचा ट्रॅक पुन्हा सुरु करून त्यांनी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केले आहे. ते लोक फार पूर्वीपासून असेच आहेत.” असे प्रिया अहुजाने सांगितले.