Priya Bapat And Umesh Kamat Attends Zee Marathi Awards : प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून पाहिलं जातं. लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. प्रिया-उमेशने आजवर अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीचे किस्से सांगितले आहेत. मात्र, नुकतीच दोघांनी जोडीने ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच २५ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगितला. हा किस्सा नेमका काय आहे? जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेश कामत ( Priya Bapat And Umesh Kamat ) लव्हस्टोरीचा हा किस्सा सांगताना म्हणतो, “आम्ही एकदा वांद्रे रेक्लेमेशनला बसलो होतो. सर्वांना ती जागा माहितीच असेल. आतापर्यंत आम्ही दोघांनी अनेक मुलाखतींमध्ये आमच्या लव्हस्टोरीचे असंख्य किस्से सांगितले आहेत. पण, हा किस्सा नवीन आहे. २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच हा किस्सा बाहेर येणार आहे. रेक्लेमेशनच्या कट्ट्यावर आम्ही असेच बाईक लावून बसलो होतो. त्यावेळी ते रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस होते. असंच आम्ही आदल्या दिवशी तिथे बसलेलो आणि अचानक दुसऱ्या दिवशी मला प्रियाचा फोन आला, ती प्रचंड घाबरलेली होती.”

हेही वाचा : पाठकबाईंचं पुनरागमन! अक्षया देवधर ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार, सोबतीला असेल ‘हा’ अभिनेता

मंचावर पिकला एकच हशा

प्रिया फोनवर म्हणाली, “अरे उमेश एका वृत्तपत्रात रेक्लेमेशनच्या कट्ट्याचा फोटो छापून आलाय. असा त्यांनी मुद्दाम आमचा म्हणून फोटो काढला नव्हता… त्यावेळी पावसाळा होता त्यामुळे त्या परिसरातला फोटो छापून आलेला. तेव्हा सुद्धा सगळे कपल्स तिथे बसलेले असायचे.”

उमेश हा किस्सा सांगताना पुढे म्हणाला, “नशीब त्यावेळी झूम वगैरे करायची पद्धत नव्हती… आणि वृत्तपत्रात अशी झूम वगैरे करून पाहायची सोय नसते हे खरंच खूप चांगलं झालं. दोन दिवस आम्ही एकमेकांची समजूत काढली होती. बहुतेक आपलं भांडं आता फुटणार आणि आता सर्वांना कळणार…” ( Priya Bapat And Umesh Kamat )

प्रिया पुढे सांगते, “एकाने तो फोटो काढला आणि तो फोटो दुसऱ्या दिवशी मुंबई वृत्तांतच्या पहिल्या पानावर छापून आला होता. आपण दिसत नाहीये… आपण ते नाही आहोत हे आम्ही दोघं एकमेकांना समजवत होतो. एवढ्यात माझ्या मैत्रिणीच्या मावशीने सुद्धा तिला विचारलं. ही प्रिया आहे का? हे मला माझ्या मैत्रिणीने फोन करून सांगितलं. मग, मी माझ्या घरी मुंबई वृत्तांतमधलं ते पानच कापून टाकलं होतं.”

हेही वाचा : “गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’

दरम्यान, प्रिया बापट आणि उमेश कामत ( Priya Bapat And Umesh Kamat ) यांच्या लव्हस्टोरीचा हा मजेशीर किस्सा ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हा किस्सा सांगताना प्रिया-उमेश स्वत: देखील खळखळून हसत होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya bapat and umesh kamat reveals 25 years ago hilarious experience of their love story watch now softnews sva 00