Priya Bapat : टेलिव्हिजन मालिका असो किंवा रुपेरी पडदा मनोरंजन विश्वातील प्रत्येक माध्यमात प्रिया बापटने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रियाने मराठीसह अनेक हिंदी सीरिजमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रिया उत्तम अभिनेत्री आहेच पण, त्याचबरोबर तिचा आवाज देखील तितकात सुमधूर आहे. अनेकदा प्रिया जुनी गाणी गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
प्रिया-उमेशची पहिली भेट ‘आभाळमाया’ मालिकेदरम्यान झाली होती. यानंतर काही महिन्यांनी दोघांमध्ये मैत्री होऊन पुढे या दोघांनी डेट करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, उमेशच्या मागे बाइकवर बसून अभिनेत्री अनेकदा ‘वादळवाट’, ‘आभाळमाया’ या मालिकांची शीर्षक गीतं गायची. प्रियाचा सुमधूर आवाज पुरस्कार सोहळ्यांदरम्यान देखील ऐकायला मिळतो. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सुद्धा प्रियाला ( Priya Bapat ) ‘आभाळमाया’चं शीर्षक गीत गाण्याची विनंती करण्यात आली होती. यावेळी देखील तिने सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं.
प्रियाने गायलं सुंदर गाणं
आता प्रियाने ( Priya Bapat ) नुकतंच “कजरा मोहब्बत वाला…” हे गाणं गायलं आहे. तिला हे गाणं गाताना ‘द तबला Guy’ म्हणजेच निखिल परळीकरने साथ दिली आहे. दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्रीने बॉलीवूडचं हे सुपरहिट गाणं पुन्हा एकदा गात जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘कजरा मोहब्बत वाला’ हे गाणं १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत’ चित्रपटातलं आहे. एवढी वर्षे होऊनही हे गाणं आजही प्रेक्षकांच्या ओठावर असतं. आशा भोसले आणि शमशाद बेगम यांच्या आवाजात हे मूळ गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे.
प्रियाच्या या व्हिडीओवर मराठी कलाविश्वातील कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “कालच तू गायलेलं ‘आभाळमाया’ ऐकलं आणि आज हे…ufff tai”, “अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम प्रिया मॅम”, “खपूच गोड”, “सुंदर गाणं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
हेही वाचा : रिंकू राजगुरुने ‘लापता लेडीज’च्या मंजू माईला भेट दिली सुंदर साडी! दोघींनी ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम, तुम्हाला माहितीये का?
दरम्यान, प्रिया बापटच्या ( Priya Bapat ) या व्हिडीओला अवघ्या काही वेळातच दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd