शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांची वेब सीरिज ‘फर्जी’ १० फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या वेब सीरिजमध्ये शाहिद कपूर एक चोर आणि तामिळ सुपरस्टार विजय सेतुपती एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. शाहिद कपूरने ‘फर्जी’ वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केल आहे. या वेब सीरीजची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते.

‘फर्जी’ प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी तिला चांगली पसंती दिली आहे. फर्जी’ ही एक हिंदी क्राइम थ्रिलर वेब सीरीज असून त्याचे दिग्दर्शन कृष्णा डीके आणि राज निदिमोरू यांनी केले आहे. या वेब सीरिजमध्ये शाहिद कपूर आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर राशी खन्ना, रेजिना कॅसांड्रा, के के मेनन, कुब्ब्रा सैत आणि इतर अनेकजण सहाय्यक भूमिकेत आहेत. यातच एक नाव म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकर होय.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Aishwarya Narkar
मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..
Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
Sharayu Sonawane
Video : ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; श्वेता खरात कमेंट करत म्हणाली…

प्रियदर्शिनीने ‘फर्जी’मध्ये शाहिद कपूरच्या कंपनीच्या रिसेप्शनिस्टची भूमिका केली आहे. ती सीरिजच्या दोन भागांमध्ये पाहायला मिळते. जेव्हा शाहिद कपूर त्याच्या कंपनीसाठी रिसेप्शनिस्टच्या मुलाखती घेतो. त्या मुलाखतीला येणाऱ्यांपैकी प्रियदर्शिनी एक असते. नंतर तिची निवड होते, असे तिचे सीन आहेत.

दरम्यान, या सीरिजशिवाय येत्या काळात प्रियदर्शिनी सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुलराणी’ या चित्रपटात फुलराणी साकारणार आहे. ती या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

Story img Loader