‘बिग बॉस १७’ च्या ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरले आहे. शोमध्ये या आठवड्यात झालेल्या टॉर्चर टास्कची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या टास्कमध्ये मनारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार व अरुण माशेट्टी एका टीममध्ये होते, तर दुसऱ्या टीममध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय आणि आयशा खान होते.
टॉर्चर टास्कमध्ये मनाराच्या टीमला अंकिताच्या टीमने खूप टॉर्चर केलं. त्यांनी मिरची पावडर, व्हॅक्स स्ट्रिप, झाडू अशा गोष्टींचा वापर टॉर्चर करण्यासाठी केला. पण त्यांची वेळ आली तेव्हा त्यांनी घरातील सर्व वस्तू लपवल्या. याच दरम्यान काही वस्तू मुनव्वरने लपवल्या आणि त्यानंतर दोन्ही टीममध्ये जोरदार वाद झाला. मुनव्वरने वस्तू जॅकेटमध्ये लपवल्यावर मनारा त्याचं संरक्षण करताना दिसली. पण यावेळी अंकिता, विकी, आयशा व इशाने मनारासाठी अपशब्द वापरले व गलिच्छ भाषेत तिच्यावर टीका केली.
या एपिसोडनंतर सोशल मीडियावर अंकिता, विकी, इशा व आयशाला खूप ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी मनाराचं समर्थन केलं. आता या टॉर्चर टास्कवर प्रियांका चोप्राच्या आईची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मनाराच्या इन्स्टाग्रामवर या भांडणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “सर्वांना लाज वाटली पाहिजे! आम्ही याला खेळ म्हणत नाही!! आम्ही आता प्रत्येकाची खरी बाजू पाहत आहोत!” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं होतं.
मन्नाराच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर मनाराची मामी व अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी कमेंट केली आहे. “देवा! यांचं वागणं किती रानटी आहे,” असं मधू चोप्रा यांनी लिहिलंय.

दरम्यान, मनाराच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. अंकिता लोखंडे, विकी, आयशा व इशाने मनाराला ज्याप्रमाणे टास्कमध्ये टॉर्चर केलं आणि नंतर भांडणात तिच्यासाठी वाईट शब्द वापरले त्याबद्दल नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. मनाराच्या बहिणीनेही या टास्कनंतर चौघांवरही टीका केली होती.