‘बिग बॉस १७’ हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शोच्या ग्रँड फिनालेला अवघे चार दिवस बाकी आहेत. अंकिता लोखंडेचा पती या शोच्या फिनालेमध्ये पोहोचू शकला नाही. मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण महाशेट्टी व अंकिता लोखंडे हे टॉप पाच स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत. मनारा फिनालेमध्ये पोहोचल्यानंतर तिची बहीण व बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे.
प्रियांका चोप्रा ही मनारा चोप्राची मामेबहीण आहे. मनारा या शोमध्ये सहभागी झाल्यानंतरही प्रियांकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत मनाराला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता मनारा फिनालेमध्ये पोहोचल्यानंतर प्रियांकाने तिचा एक फोटो पोस्ट करत तिचं अभिनंदन केलं आणि तिच्यासाठी मेसेज पाठवला आहे.
प्रियांका चोप्राने मनाराचा बिग बॉसमधील एक फोटो स्टोरीला शेअर केला. “आपलं बेस्ट दे आणि बाकी सगळं विसरून जा,” असं कॅप्शन दिलं आहे. तिने मनारा चोप्राला टॅग करत रेड हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. यासोबत प्रियांकाने मिताली आणि तिच्या आईलाही टॅग केलं आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांनीही ‘बिग बॉस १७’ मधील स्पर्धक मनारासाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. “मनारा. अभिनंदन तू फायनलमध्ये पोहोचली आहे. मला तुझा अभिमान आहे. हिंमत ठेव. तू चोप्रांची मुलगी आहेस आणि तू खरोखरच शक्तीशाली आहेस. शुभेच्छा,” असं त्यांनी व्हिडीओत म्हटलं होतं.