‘बिग बॉस १६’ शोचं विजेतेपद रॅपर एमसी स्टॅनने मिळवलं. त्याच्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. तर घरातील काही सदस्यांशी त्याची उत्तम मैत्रीही झाली. पण ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर एमसीचं वागणं बदललं असल्याचं पाहायला मिळालं. कोणत्याच पार्टीमध्ये एमसीने सहभागही घेतला नाही. शिवाय त्याचं अब्दू रोझिकशी झालेलं भांडण तर चर्चेचा विषय ठरलं. आता एमसीच्या वागण्याबाबत पुण्याचे ‘गोल्डन बॉइज’ म्हणून लोकप्रिय असलेले सनी नाना वाघचौरे आणि संजय गुजर यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनी नाना वाघचौरे आणि संजय गुजर हे एमसीचे अगदी जवळचे मित्र आहे. ‘बिग बॉस १६’मध्येही त्यांनी एण्ट्री केली होती. यावेळी एमसीबरोबर असलेली त्यांची मैत्री दिसून आली. पण आता एमसीबाबत त्यांचं मत बदललं आहे. पापाराझी छायाचित्रकारांनी जेव्हा एमसी व अब्दूमधील वादाबाबत गोल्डन बॉइजला विचारलं तेव्हा त्यांनी एमसीलाच एक सल्ला दिला.

आणखी वाचा – Video : नीता अंबानींच्या कार्यक्रमात नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडला पाहून ऐश्वर्या रायने केलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा – “१२ तास शिफ्ट करुनही…”, मराठी मालिकांमध्ये काम करण्यावरुन भडकली ऋता दुर्गुळे, म्हणाली, “मी सेटवरुनच निघून जायचे कारण…”

सनी म्हणाला, “स्टॅनचं वागणंच वेगळं आहे. त्याला आता गर्व झाला आहे. लोकांवर प्रेम करणंही गरजेचं आहे हा आमचा संदेश त्याच्यापर्यंत नक्की पोचवा. प्रसिद्धी आज आहे पण उद्या असणार की नाही हे कोणालाच माहित नाही. मात्र लोकं तुझ्याबरोबर कायम असणार आहेत. तसेच जी लोकं तुझ्या पाठी कायम उभी राहत होती त्यांना विसरु नको”.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

“कारण यामुळे आयुष्यामध्ये खूप अडचण निर्माण होऊ शकतात. मोठा भाऊ या नात्याने आम्ही त्याला हे समजावत आहोत. स्टॅनला या गोष्टीचं वाईट वाटलं तरी हरकत नाही”. एमसीचं वागणं गोल्डन बॉइजला अजिबात पटलं नाही. अब्दूशी एमसीचा झालेला वाद तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण यामध्ये अब्दूला गोल्डन बॉइजने पाठिंबा दिला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune golde boys sunny waghmare talk about bigg boss 16 winner mc stan says his behaviour change see details kmd
Show comments