पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारच्या धडकेत रविवारी ( १९ मे ) पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यासह संपूर्ण देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

पुण्यातील पोर्शे कार चालवणारा कारचालक हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. तो पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असून याप्रकरणी सध्या नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर, अल्पवयीन आरोपींच्या वडिलांसह तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेवर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. मराठी अभिनेते हृषिकेश जोशी, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांच्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने याप्रकरणी भाष्य केलं आहे.

Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Delhi High Court
Delhi High Court : वकिलाकडून न्यायमूर्तीवर अपमानास्पद टिप्पणी; दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावली चार महिन्यांची शिक्षा
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी
An attempt by the accused in the Bopdev Ghat case to mislead the police Pune news
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

हेही वाचा : मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर! अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांचा होणार सन्मान

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता चेतन वडनेरे याने यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. “माहित नाही का, पण मला नाही वाटत याला कठोर शिक्षा होईल. खरंतर झाली पाहिजे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेबद्दल मला काही बोलायचं नाहीये, नाहीतर याला सोडून मला जेलमध्ये घालतील.” या खालोखाल अभिनेत्याने अल्पवयीन आरोपी मुलाचा रॅप साँग व्हिडीओ खोटा (फेक) असल्याची एक बातमी जोडली आहे.

हेही वाचा : बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा फोन तपासते जान्हवी कपूर? ‘त्या’ प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, “मी त्याचा…”

याशिवाय अपघात झाला त्यावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. यावर अभिनेत्री गौतमी देशपांडेने “जॉली एलएलबी चित्रपट खऱ्या आयुष्यात होत आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा : जया बच्चन यांना ‘या’ नावाने हाक मारायच्या रेखा; एकाच इमारतीत राहायच्या दोघी, अमिताभ अन् रेखांची पहिली भेट…

pune
पुणे अपघाताबद्दल मराठी कलाकारांच्या पोस्ट

दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर जंक्शन येथे रविवारी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. पुण्यातील नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने चालवलेल्या पोर्शे कारने बाइकवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. सध्या या संपूर्ण प्रकरणी पोलिसांकडून तपास चालू आहे.