अभिनेत्री अक्षया हिंदळकर(Akshaya Hindalkar) सध्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्रीने वसुंधरा ही भूमिका साकारली आहे. तर, तिच्याबरोबर अभिनेता अक्षय म्हात्रेने स्क्रीन शेअर केली आहे. अभिनेत्याने आकाश ही भूमिका साकारली आहे. वसुंधरा व आकाशच्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्याचे पाहायला मिळाले. आता काही दिवसांत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. आता या सगळ्यात अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री अक्षया हिंदळकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयाबरोबर अभिनेत्री रूपल नंददेखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघी विविध ठिकाणी फिरताना दिसत आहेत. तसेच त्यांचे विविध फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सेनेरिटा हे गाणं ऐकायला मिळत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना सेनेरिटा, अशी कॅप्शन दिली आहे. तसेच रूपल नंदच्या अकाउंटला टॅग केले आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी “सुंदर”, “छान”, “छान सुंदर दिसते आहेस तू”, “दोघीसुद्धा छान दिसत आहेत”, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. तर ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता व अभिनेता विशाल निकम यानेदेखील हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. रूपल नंद व अक्षया हिंदळकर या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असून, त्या अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करताना दिसतात.

रूपल नंद सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत तिने अंजली ही भूमिका साकारली आहे. तिची ही नवीन भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ या ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत अभिजीत आमकर, शर्वरी जोग, रूपल नंद यांच्यासह आशुतोष गोखले, मधुरा जोशी हे कलाकारही दिसत आहेत. अभिनेत्रीला ‘गोठ’ या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत तिने राधाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेतही तिने काम केले आहे. काही चित्रपटांत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.

दरम्यान, अक्षया हिंदळकर याआधी तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली होती.

Story img Loader