टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांचे दररोज मनोरंजन करत असतात. त्यामुळे मालिकांना प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनात स्थान असते. सोशल मीडियामुळे या मालिकांमध्ये दाखवत असलेल्या कथेबाबत किंवा दृश्यांबाबत प्रेक्षक उघडपणे आपले मत मांडू शकतात. आता ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतील व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांनी कंमेट करत आपले मत मांडले आहे.

झी मराठी वाहिनीने ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बनी आणि चिनू-मनू यांचे रक्षाबंधनाचा सीन पाहायला मिळतो.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
zee marathi new serial savlyachi janu savali
‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार! ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका, पाहा प्रोमो
zee marathi savlyachi janu savali marathi serial starcast
तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, चिनू-मनूने बनीला राखी बांधल्यानंतर तो त्यांना स्वत: तयार केलेले ग्रीटिंग कार्ड देतो. पण फक्त ग्रीटिंग कार्ड दिल्याने चिनू-मनू नाराज होतात. मात्र जेव्हा बनी चिनू-मनूला त्यांच्या आवडीची खेळणी देतो, त्यावेळी त्यांना आनंद होतो. त्यानंतर आकाश बनीने चिनू- मूनसाठी लिहिलेले पत्र मोठ्याने वाचून दाखवतो. ते पत्र अत्यंत हृदयस्पर्शी असून चिनू-मनू आणि बनी भावुक झालेले पाहायला मिळते. तिघेजण एकमेकांना मिठी मारुन रडतात. हे पाहिल्यानंतर घरातील सगळेच भावुक झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. मात्र आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर मोठ्या प्रमाणात कंमेट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

झी मराठी इन्स्टाग्राम

काय म्हणाले नेटकरी?

पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी कंमेट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “आता हे सकारात्मक वातावरण घरात टिकून राहू दे. वसुंधरा पण थोडी स्मार्ट दाखवा.” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “मुले ही निरागस फुले. लेखकाला बुद्धी आली, बरे झाले देवा”, असे म्हणत आपले प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणतो, “लेखकाने मुलांमधील प्रेम असच टिकू द्यावं” तर एक नेटकऱ्याने, “हृदयस्पर्शी एपिसोड” असे म्हणत कौतुक केले आहे.

हेही वाचा: “माझे आयुष्य…”, बिग बॉसच्या शोबाबत पुष्कर जोगचं वक्तव्य; म्हणाला, “हा स्क्रिप्टेड…”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, वसुंधरा आणि आकाश यांचे हे दुसरे लग्न आहे. वसुंधराला बनी नावाचा मुलगा असतो आणि आकाशला चिनू-मनू नावाच्या दोन मुली असतात. बनी हा चिनू-मनूला बहिणी मानतो मात्र त्या दोघी त्याला भाऊ मानत नाहीत. आता बहिण-भावांमधील हे प्रेम पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

आता मालिकेत पुढे काय घडणार, बनी आणि चिनू-मनू यांच्यातील प्रेम तसेच राहणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.