आकाश व वसुंधराची जोडी प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे. ज्या पद्धतीने आकाश वसुंधराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ते प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचे मन जिंकून घेताना दिसत आहे. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाश वसुंधराची साथ देणार

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत सध्या नवीन वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, वसुंधरा किचनमध्ये जाते, त्यावेळी तिथे तिची मोठी व लहान जाऊ काम करत असल्याचे दिसत आहे. वसुंधरा विचारते की मी पोळ्या करून देऊ? तितक्यात तिची सासू जयश्री येते व तिच्या मोठ्या सुनेला हाक मारत म्हणते, “अवनी हिला किचनमध्ये घ्यायचं नाही.” त्यानंतर पाहायला मिळते की आकाश त्याच्या आईला विचारतो, “वसुंधरांनी या घरातील पाणी प्यायचं नाही असं म्हणालीस तू?” जयश्री म्हणते, “या घरामध्ये हिला अन्न-पाणी मिळणार नाही.” आकाश तिला विचारतो, “हा तुझा निर्णय पक्का आहे?” त्यावर जयश्री होकार देत आकाशला म्हणते, “आणि तूसुद्धा माझं ऐक…”, तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आकाश तिला खूणेने थांबायला सांगतो. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आकाश व वसुंधरा घराबाहेर जातात व ते तिथे चूल मांडतात. त्यावर दोघे मिळून स्वयंपाक करतात. स्वयंपाक झाल्यानंतर आकाश वसुंधराला घास भरवताना दिसत आहे. ते दोघेही आनंदात दिसत आहेत. हे सर्व जयश्री पाहत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर, “आकाश आणि वसू प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “छान, नवरा-बायकोमधील नातं असं सकारात्मक असावं”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “मस्तच, असेच कायम सोबत रहा”, आणखी एका नेटकऱ्याने मालिकेचे कौतुक करत म्हटले, “हा असा ट्रॅक खूप छान वाटतो, पण तो तसाच ठेवा प्लीज.”

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आकाश व वसुंधराच्या संसारात मोठी संकटे येत असल्याचे पाहायला मिळत होते. वसुंधराचा पहिला नवरा शार्दुल, आकाशची आई जयश्री यांच्यामुळे आकाशच्या मनात वसुंधराविषयी गैरसमज निर्माण झाल्याचे पाहायला मिळत होते. आता मात्र त्यांच्यातील सर्व गैरसमज दूर झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा: दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल

आता आकाश व वसुंधराला प्रत्येक अडचणींवर एकत्र मात करताना पाहण्यासाठी तसेच मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punha kartvya aahe akash will support vasundhara against his mother netizens happy after watching promo says be together always serial nsp