‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) मालिकेत नवीन पात्राची एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. वंदना गुप्ते एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वंदना गुप्तेंची पहिली झलक पाहायला मिळत आहे. त्यांनी या मालिकेत गुरुमाता ही भूमिका साकारली आहे. या गुरुमाता आकाशच्या वडिलांच्या बहीण आहेत. आता मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर गुरुमाता अत्यंत शीघ्रकोपी असल्याचे पाहायला मिळत आहे.

मी फक्त घरच्या सुनेच्या…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, एक महिला ठाकूर कुटुंबाच्या घरी येते आणि सांगते की गुरुमाता संध्याकाळी येतील. त्यानंतर प्रोमोमध्ये हे पाहायला मिळते की, जयश्री तनयाच्या खोलीत जाते. तनया तिला विचारते, कोण आहेत त्या? जयश्री म्हणते की, ती येणार म्हणजे नसता ताप. एक नंबरची हट्टी आणि खडूस. सुनांना अशा-तशा सोडत नाहीत. एक चूक झाली की, कोप होतो.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “सूर्याच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांना…”, तुळजाच्या हाती लागणार शत्रूविरूद्ध पुरावा; ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये ट्विस्ट
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tharla tar mag taking leap or not netizens asked jui gadkari
‘ठरलं तर मग’ मालिकेत लीप येणार का? जुई गडकरीचं सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण; म्हणाली, “कृपया…”
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, एक महिला गाडीतून उतरते. तिच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत. वसुंधरा आरती ओवाळून स्वागत करते. घरातील इतर मंडळी म्हणजेच आकाश, तनया, आकाश, त्याचा मोठा भाऊ, जयश्री व आकाशचे वडील सर्व जण स्वागतासाठी उभे आहेत. त्यानंतर जयश्री वसुंधराला पाणी आणण्यासाठी सांगते. वसुंधरा पाणी आणून गुरुमातेला देते. मात्र, वसुंधराने आणलेले पाणी पाहताच गुरुमाता रागाने म्हणते, मी फक्त घरच्या सुनेच्या हातून पाणी घेते. त्यानंतर जयश्री घाबरत घाबरत, आणते, असे म्हणते आणि ती पाणी घेऊन येते. त्यानंतर ती पाणी बघते आणि म्हणते की, अशुद्ध पाणी आहे, असे म्हणून ती ग्लास जोरात जमिनीवर फेकते. गुरुमातेचे हे रूप पाहून सर्व जण घाबरलेले दिसत आहेत.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कोण आहेत ह्या शीघ्रकोपी गुरुमाता…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत दाखविल्याप्रमाणे वसुंधरा व आकाश या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. आता लग्नानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. वसुंधराचा पहिला पती शार्दुलने त्यांच्या आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर वसुंधराविषयी घरच्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाले होते. मात्र, सत्य समोर आल्यानंतर आकाश वसुंधराच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता

मालिकेत आता वंदना गुप्ते एका नव्या भूमिकेत दिसत आहेत. मालिकेत त्यांचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. आता गुरुमातेच्या येण्याने ठाकूर कुटुंबात काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच वसुंधराबरोबर गुरुमातेचे नाते कसे असणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. इतरांप्रमाणे वसुंधरा तिच्या प्रामाणिक व प्रेमळ स्वभावाने गुरुमातेचे मन जिंकून घेणार का, गुरुमाता व वसुंधरा यांच्यात वेगळे नाते पाहायला मिळणार का की, जयश्रीप्रमाणेच गुरुमातेलादेखील वसुंधरा आवडणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader