‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) मालिकेत नुकतीच ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत त्यांनी गुरुमाता हे पात्र साकारले आहे. गुरुमाता असण्याबरोबरच त्या आकाशच्या वडिलांची बहीणसुद्धा आहेत. मालिकेत गुरुमाता शीघ्रकोपी असल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये पुन्हा एकदा रुद्रावतार पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जयश्री गुरुमातेला म्हणते, “गुरुमाता भोजनास सुरुवात करावी”, जयश्रीच्या बोलण्यानंतर गुरुमाता जेवायला सुरुवात करते. मात्र, पहिलाच घास घेतल्यानंतर गुरुमाता रागाने वसुंधराला म्हणते, “माझं इतक्या वर्षांचं व्रत एका क्षणात मोडलंस, अगं, माझ्या जेवणात लसूण आहे.” गुरुमातेचे हे बोलणे ऐकल्यानंतर तनया म्हणते, “तिने माझ्यासमोर भाजीत लसूण घातलाय.” त्यानंतर गुरुमाता वसुंधराकडे बघत म्हणते, “आता शिक्षेला तयार हो.”तनया विचारते, “परीक्षा म्हणजे?” तनयाच्या प्रश्नावर उत्तर देताना गुरुमाता म्हणते, “जलसमाधी आणि तिची चूक आहे, हे सांगणाऱ्या या मुलीलासुद्धा जलसमाधी घ्यायची आहे.” प्रोमोच्या शेवटी वसुंधरा व तनया पाण्यात उभ्या असल्याचे दिसत आहे. तनयाच्या चेहऱ्यावर भीती, तर वसुंधराच्या चेहऱ्यावर शांत भाव दिसत आहेत. आकाशसह इतर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मात्र काळजी पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना, “वसुंधराला गुरुमाता घ्यायला लावणार जलसमाधी…!”,अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तनया नेहमीच वसुंधराविरुद्ध कटकारस्थान करताना दिसते. ती सतत जयश्रीच्या मनात वसुंधराविषयी गैरसमज निर्माण करत असल्याचे दिसते. वसुंधरादेखील तिला वेळोवेळी उत्तर देते. मात्र, आता तनयाने गुरुमातेसमोर वसुंधराला खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. आता मात्र, वसुंधराबरोबर तिलाही जलसमाधीची शिक्षा होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर

आता मालिकेत पुढे काय होणार, वसुंधरा व तनया यांना खरंच जलसमाधी घ्यावी लागणार की गुरुमातेच्या परीक्षेत वसुंधरा पास होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punha kartvya aahe new promo guru mata will punish vasundhara and tanya watch marathi serial nsp