‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) या मालिकेत वसुंधरा व तनयामध्ये सतत छोटी-मोठी भांडणे होताना पाहायला मिळतात. तनया सातत्याने वसुंधराविरुद्ध कट-कारस्थान करताना दिसते. ती जयश्रीच्या मनात वसुंधराविषयी गैरसमज निर्माण करताना दिसते. घरच्यांच्या मनात वसुंधराची वाईट प्रतिमा तयार करण्यासाठी तनया नेहमीच प्रयत्न करताना दिसते. आता मात्र वसुंधराच्या घरात खास पाहुणीची एन्ट्री होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसुंधरा-शिवा एकत्र येणार…

झी मराठी वाहिनीने पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एका खास पाहुणीची घरात एन्ट्री होणार असल्याचे म्हटले आहे. ही पाहुणी म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून शिवा आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, वसुंधराच्या घरात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने अनेक महिला एकत्र आल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमात वसुंधरा व तनया पिंगा गं पोरी पिंगा या गाण्यावर डान्स करत आहेत. याच वेळी फुगडी खेळताना तनयाचा तोल जातो आणि ती जमिनीवर पडते.

तनया वसुंधराला रागात म्हणते, “स्वत:ला डान्स करता येत नाही म्हणून मुद्दाम ढकललंस ना मला.” तनयाचा हा आरोप ऐकून वसुंधरा म्हणते, “तनया अगं, मी तुला धक्का नाही दिला. तुझा बॅलन्स गेला आणि म्हणून तू पडलीस” त्यानंतर तनया जयश्रीकडे बघत म्हणते, “आई, खूप दुखतंय मला.” एक महिला म्हणते की, इथे कोणी डॉक्टर आहे का? जाऊ दे मीच कॉल करते. तेवढ्यात थांबा, असा आवाज ऐकायला येतो. सर्व जण आवाजाच्या दिशेने पाहतात. तर हा आवाज शिवाचा असल्याचे समजते. शिवाला पाहताच वसुंधराला आनंद झाल्याचे दिसत आहे. शिवा म्हणते, “अगं मी आहे ना, डॉक्टर वगैरे बोलावायची काय गरज आहे?” त्यानंतर शिवा तनयाचा पाय ओढताना दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना “हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जमणार वसू आणि शिवाची केमिस्ट्री…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे. “शिवा व वसुंधराने मिळून तनयाला अद्दल घडवावी. शिवापुढे तनया काय बोलणार”, “शिवा तनयाला चांगली अद्दल घडव “, “वाह, शिवा या मालिकेमध्येसुद्धा येणार”, नेटकऱ्यांनी अशा कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

आता पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये शिवाची एन्ट्री झाल्यानंतर काय गमती-जमती घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punha kartvya aahe new promo shiva entry as a guest vasundhara seems happy to see shiva watch nsp