‘पुन्हा कर्तव्य आहे'(Punha Kartvya Aahe) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरताना दिसत आहे. वसुंधराने तिचा पहिला नवरा शार्दुल जिंवत असल्याचे सत्य आकाश व त्याच्या कुटुंबाला सांगितले नव्हते. मात्र, अचानक शार्दुल लकी हे नाव बदलून तिच्या आयुष्यात आला. वसुंधराशी वाईट वागणाऱ्या आणि स्वत:च्या आई-वडिलांना अतोनात छळणाऱ्या शार्दुलने वसुंधराच्या सासरच्या कुटुंबियांचे मन जिंकून घेतले. आकाशची आई त्याला तिचा चौथा मुलगा मानते. काही दिवसांपूर्वी लकी उर्फ शार्दुल हाच वसुंधराचा पहिला पती असून तो जिंवत असल्याचे आकाश व तिच्या कुटुंबाला समजते. त्यानंतर सर्वजण वसुंधराचा द्वेष करतात. आकाशलादेखील वसुंधराबाबत गैरसमज निर्माण होतो. आता ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

आकाश वसुंधराच्या बाजूने ठामपणे उभा राहणार…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. बनील वाचवण्यासाठी गेल्यानंतर आकाशला गोळी लागली होती. आकाश आता बरा झाला असून वसुंधरा व त्याच्यातील गैरसमजदेखील दूर झाले आहेत. मात्र, यासंदर्भात पोलिस आता तपास करत आहेत. कोर्टात या केसवर सुनावणी चालू असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत. वकील म्हणतो, “आकाश ठाकूरांवर हल्ला वसुंधरा ठाकूर यांनी घडवून आणला.” साक्ष देण्यासाठी आलेला व्यक्ती म्हणतो या मॅडमनी सुपारी दिली म्हणून मी हल्ला केला. शार्दुल म्हणतो, “हिला ना आयुष्यभर फक्त पैशात लोळायचं होतं.” आकाशची आई म्हणते, “हिने माझ्या लेकाला फसवून लग्न केलंय” वसुंधराला तिच्यावर होत असणारे आरोप सहन होत नसल्याचे दिसत आहे. ती म्हणते, सगळं खोटंय, खोटं बोलत आहेत सगळे. असे म्हणत ती चक्कर येऊन जमिनीवर पडते. आकाश तिला सावरण्यासाठी पुढे येतो. तो वसुंधराची बाजू कोर्टासमोर मांडताना म्हणतो, “हा सगळा कट माझ्या आईने म्हणजेच जयश्री ठाकूर यांनी रचला आहे.”

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?
इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “बायकोची बाजू मांडताना आकाश आईच्या विरोधात जाणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट लिहिले, “आकाश सर खूप चांगलं केलं.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “अरे त्या विशाखा आणि तनयाला समोर आणा आणि धूवून टाका”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “आकाश तुझा अभिमान आहे. कायम खऱ्याच्या बाजूने उभा राहतोस”, एका नेटकऱ्याने लिहिले, “आकाश वसुंधराला पाठिंबा देतो हे बघताना छान वाटते.”

हेही वाचा: Video : साऊथ इंडस्ट्री गाजवणारी मृणाल ठाकूर जेव्हा अहिराणी भाषेत बोलते…; नेटकरी म्हणाले, “आम्हाले अभिमान शे…”

आता आकाशला मारण्याचा नक्की प्लॅन कोणाचा होता, हे समोर येणार का, आकाश प्रमाणेच त्याच्या कुटुंबातील सर्वांचा वसुंधराबद्दल गैरसमज दूर होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader