२०२५ वर्ष सुरु झाल्यानंतर ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी’ संपली आणि आता क्रिकेटप्रेमींना ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ची प्रतीक्षा लागली आहे. यावर्षीचा क्रिकेट हंगाम कसा असणार आहे याचे वेळापत्रक बघायला क्रिकेटप्रेमींनी सुरुवात केली आहे. त्यात आयपीएल जवळ आले असून यंदाचे आयपीएल कसे होणार? ऑक्शन झाल्यावर कोणता नवा खेळाडू कोणत्या संघाचा कॅप्टन असेल? याची चर्चा क्रिकेटविश्वात रंगत आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाच्या ‘पंजाब किंग्ज’ (PBKS) चा ‘आयपीएल २०२५’ साठी कॅप्टन कोण असेल याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. आता याची घोषणा करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२५ साठी ‘पंजाब किंग्ज’चा कॅप्टन कोण असेल ही घोषणा करण्यात आली असून संघाच्या व्यवस्थापणाने एक अनोखा मार्ग निवडला . ही घोषणा आज (१२ जानेवारी २०२४) ‘बिग बॉस १८’ च्या एपिसोडमध्ये करण्यात आली आहे. या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या वीकेंड एपिसोडच्या प्रोमोमध्ये श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल आणि शशांक सिंग दिसले होते. या एपिसोडमध्ये हे क्रिकेटपटू बिग बॉसच्या घरात स्पर्धकांबरोबर अंडरआर्म क्रिकेट खेळताना दिसले. त्यांच्याबरोबर या शोचा होस्ट सलमान खान सुद्धा दिसला.

हेही वाचा…अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?

श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा नवा कर्णधार

श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) ‘पंजाब किंग्ज’चा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. श्रेयसला पंजाबच्या संघाने आयपीएल मेगा ऑक्शन २०२५ मध्ये तब्बल २६.७५ कोटींना संघात घेतले आहे. गेल्या हंगामात अय्यरने ‘कोलकाता नाइट रायडर्स’ला (KKR) आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून दिले होते. ‘पंजाब किंग्ज’ने यजुवेंद्र चहलला १८ कोटींना विकत घेतले आहे.

रिकी पाँटिंग यांनी दिले होते संकेत

रिकी पाँटिंग आणि श्रेयस अय्यर यापूर्वी दिल्ली कॅपिटल्समध्ये एकत्र काम केले आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पुन्हा एकदा श्रेयसबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत पाँटिंग म्हणाले होते, “मला श्रेयसबरोबर काम करायचं आहे. मी यापूर्वी त्याच्यासह काम केलं आहे, आणि तो एक उत्तम व्यक्ती आणि जबरदस्त खेळाडू आहे. जर आम्ही त्याला आमचा कर्णधार बनवायचं ठरवलं, तर तो आमच्यासाठी उत्कृष्ट नेता ठरेल, आणि मला खात्री आहे की आम्ही तसा निर्णय घेऊ. शिवाय, तो गेल्या वर्षी चॅम्पियनशिप जिंकणारा कर्णधार होता. त्यामुळे त्याला पंजाबकडे आणण्यासाठी अनेक कारणे आहेत.”

हेही वाचा…‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?

सगळे हंगाम खेळूनही पंजाबला आजवर एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. प्रीती झिंटा सहमालक असलेल्या या संघाचे पूर्वीचं नाव ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ असे होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी संघाचे नाव ‘पंजाब किंग्ज’ असे केले. पंजाबचा संघ आतापर्यंत १६ कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या लिलावात पंजाबने नव्याने संघबांधणी केली. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आता पंजाब किंग्जचे प्रशिक्षक असणार आहेत. पंजाबने श्रेयस अय्यरसाठी तब्बल २६.७५ कोटी रुपयांची बोली लावून त्याला ताफ्यात समाविष्ट केले.

हेही वाचा…Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक

श्रेयसच्या नेतृत्वात गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरले होते. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स नावावर असणारा युझवेंद्र चहल यांच्यासाठी पंजाबने प्रत्येकी १८ कोटी रुपये मोजले. पंजाबने प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग यांना लिलावापूर्वी रिटेन केले होते. पॉन्टिंग प्रशिक्षक असल्यामुळे पंजाबने ऑस्ट्रेलियाच्या ५ खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट केले. पंजाबने लिलावात तब्बल ११९.६५ कोटी रुपये खर्च करून नव्याने संघबांधणी केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab kings announce new captain for 2025 ipl season in big boss 18 show know who is new skipper psg