Bigg Boss Marathi Season : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा लवकरच अंतिम टप्पा सुरू होणार आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’चा प्रवास १०० दिवसांचा नसून फक्त ७० दिवसांचा आहे. त्यामुळे या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. ६ सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता जाहीर होणार आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सर्वाधिक चर्चेत असलेला सदस्य म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या खेळासह साधेपणाने, सोज्ज्वळ स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. अनेकदा खेळताना त्याचे वाद झाले असतील. पण तो स्वतःहून कोणाशी वाद घालताना सहसा दिसला नाही. सुरुवातीपासून सूरजला संपूर्ण महाराष्ट्रासह मराठी कलाकार मंडळी देखील पाठिंबा देताना दिसत आहेत. सध्या ‘बिग बॉस मराठी’मध्ये फॅमिली वीक सुरू आहे. यानिमित्ताने सूरजला त्याची आत्या आणि बहिणी भेटायला आल्या. अशातच सूरजच्या आई-वडिलांचा फोटो समोर आला आहे.

yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Bigg Boss Marathi Season 5 Fame Akshay Kelkar will get married and share first vlog with future wife
Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Prajakta Mali
“मी बॉस असणं खूप जणांना खुपलं”, प्राजक्ता माळी म्हणाली, “त्यांनी माझ्याकडे शेवटपर्यंत…”
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी ५’ फक्त ७० दिवसांत का संपतंय? छोटा पुढारीचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “शोला टीआरपी देणारेच…”

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पहिल्याच आठवड्यात बघेर झालेल्या पुरुषोत्तमदादा पाटील यांनी सूरज चव्हाणच्या आई-वडिलांचा फोटो दाखवला आहे. याचा व्हिडीओ त्यांनी नुकताच शेअर केला आहे. सूरजच्या कुटुंबाला भेटून पुरुषोत्तमदादा पाटील भावुक झाले.

व्हिडीओत पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले, “मरी माता मित्रमंडळांनी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी आता सूरज चव्हाणच्या आत्या जवळ आहे. माझ्या शेजारी त्याची आत्या बसली आहे. आत्याने त्याच्या आई-वडिलांचा फोटो दाखवला. हे त्याचे आई-वडील आहेत. या फोटोमध्ये आजी आणि सूरजची भावंडं आहेत. आजीच्या मांडीवर सूरज बसलेला आहे. सगळे गावातले मित्र आणि नातेवाईक इथे आहेत. मला खूप छान वाटतंय. ज्या आत्याचा त्याने कार्यक्रमात नामोल्लेख केला. त्या आत्या माझ्याबरोबर आहेत.”

सूरज चव्हाण
सूरज चव्हाण

पुढे पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले, “खरंतर त्याच्या आत्या आणि बहिणीच आहेत. तर मी पण खूप भावुक झालोय. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सूरज चव्हाण कुठेही डगमगला नाही. त्याची आत्या असेल, बहिणी असतील, यांची साथ त्याला राहिलीच. पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतोय. आज त्याचे आई-वडील नाहीयेत. त्याच्या आई-वडिलांचा फोटो पाहिला आणि खरंच मला भरून आलंय. आज या ठिकाणी किर्तन आहे. त्यानंतर सूरजचं श्रद्धास्थान असलेल्या मरी माता मंदिरात जाणार आहे. रामकृष्णहरी…”

हेही वाचा – Video: अभिजीत आणि निक्कीची ‘बिग बॉस’ने घेतली फिरकी, जेवण भरवण्याची दिली परवानगी अन् मग…

व्हिडीओ पाहा

दरम्यान, पुरुषोत्तमदादा पाटील यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सूरज चव्हाण जर जिंकला तर त्यात खरंच पुरुषोत्तम दादाचा खारीचा वाटा नक्की असणार आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “सूरज ट्रॉफी घेऊन येणार.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “सगळ्यांनी सूरजला सपोर्ट करा. सूरज विजयी झाला पाहिजे.”

Story img Loader