टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता वरूण तुर्कीने अभिनय क्षेत्राला अलविदा केला आहे. तब्बल १३ वर्षे अभिनयसृष्टीत काम केल्यानंतर वरुणने आपली आवड जपण्यासाठी हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा वरुण आता पुन्हा स्क्रीनवर दिसणार नाही. तो ‘कुबूल है’ या मालिकेसाठी विशेष ओळखला जातो.

Video: दमदार अ‍ॅक्शन अन् थरार; प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’चा ट्रेलर प्रदर्शित, अवघ्या काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

वरुणने स्वतः पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. वरुण सध्या भारतात नाही आणि त्याची आवड असलेल्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे. वरुण सध्या कुकिंग शिकत आहे. तो न्यूझीलंडच्या प्रसिद्ध कुलिनरी कॉलेज ले कॉर्डन ब्ल्यूमध्ये कुकिंगचे शिक्षण घेत आहे. १३ वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यानंतर आता वयाच्या ३३ व्या वर्षी वरुणला त्याचा कुकिंगचा छंद जपत त्यातच करियर करायचं आहे. टीव्ही ९ हिदींने याबद्दल माहिती दिली आहे.

“तुझ्या आयुष्यातून हरवलेले रंग…” कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला लिहिलं प्रेम पत्र

कुकिंगची डिग्री घेत असतानाच वरुण बिझनेसमध्ये डिग्री घेण्याची तयारी करत आहे. वरुणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या इंटरनॅशनल मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याच्या आईला स्वयंपाक करताना पाहून त्याच्यात स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. कोणीही स्वयंपाक करू शकतं, असा वरुणचा विश्वास आहे. स्वयंपाक करणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण संस्मरणीय जेवण बनवणं ही मोठी गोष्ट आहे, असं तो म्हणतो.

TVF च्या ‘या’ लोकप्रिय वेब सीरिजविरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; अश्लील व असभ्य भाषा ठरली कारण

पुढे वरुण सांगतो की, “मी अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. त्यामुळे अन्नाशी माझे नाते अधिक घट्ट होत गेलं. मी खूप लवकर पैसे कमवू लागलो. त्यामुळेच आता मी माझी आवड जपत करत आहे. मी माझं पॅशन फॉलो करू शकत नाही, याचं मला नेहमी दुःख होतं. पण जेव्हा मला वाटलं की ही योग्य वेळ आहे, तेव्हा मी अभिनयाला अलविदा म्हटलं.”

“स्वयंपाक करणे हा नेहमीच माझा छंद आणि आवड राहिली आहे. पण १३ वर्षांपासून मी टेलिव्हिजन जगताचा एक भाग राहिलो आहे. १३ वर्षांत मी खूपदा धडपडलो व सावरलो. करोनामुळे मला अनेक गोष्टींचा नव्या पद्धतीने विचार करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला माझं पॅशन फॉलो करायचं असल्याचं मी ठरवलं आणि मी कुकिंग इंडस्ट्री जॉइन केली,” असं वरुण तुर्कीने मुलाखतीत सांगितलं.