गेल्या वर्षभरात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. नुकतीच आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने नुपूर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधली. आता लवकरच हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सुरभी ज्योती आहे.

हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुरभी ज्योतीला ओळखले जाते. ‘कबूल है’ या मालिकेतून सुरभी प्रसिद्धीझोतात आली. आता लवकरच सुरभी तिचा प्रियकर सुमित सुरीबरोबार लग्नबंधनात अडकणार आहे. उत्तर भारतीय पद्धतीनुसार सुरभी व समितचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय व जवळचा मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत.

सुरभी व सुमितच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, यावर्षी ६ ते ७ मार्चदरम्यान दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ४ मार्चपासून लग्नाअगोदरच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार असून ८ मार्चपर्यंत लग्नाचे कार्यक्रम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दोघांच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

हेही वाचा- अभिषेक कुमारला मानसिक त्रास दिल्याने सेलिब्रिटी संतापले; इशा मालवीयच्या आईने सर्वांवर केली टीका, पोस्ट चर्चेत

या अगोदर सुरभीचे नाव अभिनेता पर्ल व्ही पुरीबरोबर जोडण्यात आले होते. सुरभी व पर्ल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सुरभीने या अफवांवर स्पष्टीकरण देत आम्ही चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये सुरभी सुमित सुरीला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यावेळी सुरभीने या चर्चांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.

Story img Loader