मराठी मालिका आणि प्रेक्षक यांचं नातं बऱ्याच वर्षांचं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. हळूहळू मालिकांचा ट्रेंड बदलत असला तरी प्रेक्षक तितकंच प्रेम करताना दिसत आहेत.
सध्या मालिकांचा टीआरपी खूप महत्त्वाचा आहे. टीआरपीवर आधारित आता मालिकेचा कालावधी असतो. त्यामुळे या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सतत वाहिन्यांमध्ये चढाओढ सुरू असते. नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असतात. अशातच प्रेक्षकांना नेहमी जुन्या मराठी मालिकांची आठवण होते.
मराठी मालिकाविश्वात अशा बऱ्याच मालिका आहेत; ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘दामिनी’ आणि ‘दे धमाल’. दोन्ही मालिका प्रचंड गाजल्या होत्या. अजूनही या मालिकांची चर्चा होतं असते. तुम्ही देखील ‘दामिनी’ आणि ‘दे धमाल’ मालिकांचे चाहते आहात, तर त्यासंबंधित क्विझमधील प्रश्नांची अचूक उत्तरं द्या.