‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील मालिकेच्या माध्यमांतून अभिनेत्री राधा सागर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत राधाने ‘अंकिता’ हे पात्र साकारले होते. आता अभिनेत्री खऱ्या आयुष्यतही आई होणार आहे. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राधाने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. या वेळी राधाने गर्भधारणा, पती आणि कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा याबद्दल बरेच काही सांगितले.
राधा सागर गरोदरपणाबद्दल सांगताना म्हणाली, “सध्या माझ्या गरोदरपणाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आमच्या घरी नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवसापासून मी योग्य आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित केले होते. या टप्प्यात, निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी आपण वेळेवर खाणे आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. बाळाचे आरोग्य हे आईच्या आरोग्यावर अवलंबून असते, त्यामुळे सर्व गोष्टींचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे.”
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे आणि पृथ्वीक प्रतापचं ‘हे’ खास नातं माहितेय? जाणून घ्या
लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय का घेतला? याविषयी सांगताना राधा म्हणाली, “माझ्या आणि सागरच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. मी लग्नानंतर माझ्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. आमच्याकडे स्वतःसाठी आणि करिअरसाठी पुरेसा वेळ होता. त्यामुळे आधी करिअर व्यवस्थित करून त्यानंतर आम्ही बाळाचा विचार करण्याचा निर्णय घेतला. गरोदरपणात नवरा आणि घरच्यांचा पाठिंबा असायला हवा. मूल होऊ द्यायचं की नाही हा वैयक्तिक निर्णय असतो आणि आता करिअरमधून ब्रेक घेतल्यावर मी हा निर्णय घेतला.”
हेही वाचा : नाटय़रंग: ‘किरकोळ नवरे’भारी प्रयोग..
“आजकाल काही लोक सरोगसी आणि आयव्हीएफ गर्भधारणा या गोष्टींची निवड करतात. परंतु, मला सामान्य गर्भधारणा हवी होती आणि मी ती निवडली. माझ्या प्रसूतीनंतर मी माझ्या बाळाला वेळ देण्याचे ठरवले आहे, मला काम पुन्हा सुरू करण्याची घाई नाही.” असे राधा सागरने सांगितले.