गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार मनोरंजनसृष्टीतले गोड कपल मानले जातात. इंडियन आयडॉलमधून राहूल घराघरांत पोहचला. दोन महिन्यांपूर्वीच दिशा परमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत राहुलने ही आनंदाची बातमी दिली होती. आता नुकतचं राहूल आणि दिशाच्या लेकीचं बारस पार पडलं आहे.
हेही वाचा- “आईने माझे व सुशांतचे सगळे फोटो फाडले,” अंकिता लोखंडेचा खुलासा; म्हणाली, “नंतर सहा महिन्यांनी…”
राहुल आणि दिशाच्या लेकीच्या दोन महिन्यानंतर तिचं बारसं करण्यात आलं. राहुलने आपल्या सोशल मीडियावर लेकीच्या बारश्याचे फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये राहूलने त्याच्या लाडक्या लेकीच्या नावाचा खुलासाही केला आहे. राहुल आणि दिशाने आपल्या लाडक्या लेकीच नाव नव्या ठेवलं आहे. ‘नव्या’ नावाचा अर्थ खूप सुंदर आहे. ‘नव्या’ नावाचा अर्थ आहे सगळ्यांच्या कौतुकास पात्र असणारी व्यक्ती.
राहुल आणि दिशाने १६ जुलै २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. ‘बिग बॉस १४’च्या घरात असतानाच राहूलने दिशाला प्रपोज केलं होतं. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.