गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार गेल्या वर्षी आई-बाबा झाले. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी २० सप्टेंबर २०२३ला दिशा परमारने एका गोंडस मुलीला जन्म दिला. “घरी लक्ष्मी आली,” असं लिहित दोघांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून चाहते राहुल व दिशाच्या लेकीला पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर चार महिन्यांनंतर राहुल व दिशाने लेकीची पहिली झलक दाखवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर राहुल वैद्य व दिशा परमारच्या लेकीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावरील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये दोघं सर्व पापाराझींना आपल्या मुलीची ओळख करून देताना दिसत आहे. राहुल व दिशाने त्यांच्या मुलीचं नाव ‘नव्या’ ठेवलं आहे. नव्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – रिंकू राजगुरु सुबोध भावेसह झळकणार नव्या चित्रपटात, जोडीला असणार प्रार्थना बेहेरे, फोटो आले समोर

या व्हिडीओवर राहुल व दिशाच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘राहुलची कार्बनी कॉपी’, ‘सेम राहूल’, ‘पूर्णपणे राहूलसारखीच दिसतेय’, ‘नव्या खूप गोड आहे’, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेत्याने रेस्टॉरंटमध्ये एकाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर म्हणाला, “मी असाच आहे…”

दरम्यान, जेव्हा राहुल बाबा झाला तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया होती की, मला मुलगी झाल्याचं समजताच मी तीन-चार तास गप्प बसलो होतो. काय होतंय? हेच कळतं नव्हतं. मी सहा वेळ रडलो. अजूनही जेव्हा मुलीला पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू अनावर होतात. जेव्हा मी तिच्याशी बोलतो तेव्हा मला दाटून येत. या आनंदाच्या क्षणी सर्वात पहिल्यांदा फोन मला सोनू निगम यांनी केला. ‘आमचा मुलगा बाबा झाला’ म्हणत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul vaidya and disha parmar revealed daughter navya face video goes viral pps